नांदेड, परभणी, हिंगोली : सहा लाखांवर लाभार्थ्यांची पडणार ‘सन्मान'मध्ये भर

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सहा लाखांवर लाभार्थ्यांची पडणार ‘सन्मान'मध्ये भर
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सहा लाखांवर लाभार्थ्यांची पडणार ‘सन्मान'मध्ये भर

नांदेड : पंतप्रधान किसान सन्मान योजनेची व्याप्ती वाढविण्यात आल्याने नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील बहुभूधारक शेतकरी खातेदारांमधून लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. त्यानंतर सुमारे सहा लाखांवर नवीन लाभार्थी शेतकऱ्यांची भर पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये दर चार महिन्यांनंतर तीन टप्प्यांमध्ये दिले जात होते. आता या योजनेअंतर्गत जमीनधारणा क्षेत्राची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व पात्र खातेदार शेतकऱ्यांना ही योजना लागू झाली आहे. 

नांदेड जिल्ह्यातील १ हजार ५७५ गावांमध्ये एकूण ७ लाख ९५ हजार ८०० शेतकरी खातेदार आहेत. त्यापैकी २ लाख ९१ हजार २२१ शेतकरी खातेदारांची माहिती या योजनेअंतर्गत अपलोड करण्यात आली. उर्वरित ५ लाख ४ हजार ५७९ शेतकऱ्यांपैकी पात्र शेतकरी निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातून अंदाजे चार ते साडेचार लाख शेतकरी पात्र ठरू शकतील.

परभणी जिल्ह्यातील ८४८ गावांतील ३ लाख ९४ हजार ४६३ शेतकरी खातेदार आहेत. त्यापैकीच ३ लाख ३५ हजार २९३ शेतकरी खातेदार पीएम किसानसाठी पात्र आहेत. पहिल्या टप्प्यात १ लाख ७४ हजार १२८ शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली. उर्वरित १ लाख ६१ हजार ७५ शेतकऱ्यांमधून पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करून याद्या तयार केल्या जात आहेत. आणखी एक ते दीड लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरू शकतील. 

जूनअखेर लाभार्थी यादी होणार तयार

हिंगोली जिल्ह्यात ७७१ गावांतील सुमारे २ लाख ५५ हजार शेतकरी खातेदारांपैकी १ लाख ४२ हजारांवर पात्र शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली. उर्वरित शेतकऱ्यांपैकी १ लाखावर शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरू शकतील. या महिन्याच्या अखेरपर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार होतील. त्यानंतर अंतिम पात्र शेतकरी खातेदारांची संख्या निश्चित होईल, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com