agriculture news in Marathi, Six lakh quintal seed will provide by Mahabeez, Maharashtra | Agrowon

खरिपासाठी सहा लाख क्विंटल बियाणे
टीम अॅग्रोवन
रविवार, 29 एप्रिल 2018

अकोला : आगामी हंगामाच्या दृष्टीने महाबीजने सुमारे पाच लाख ९७ हजार ७७४ क्विंटल बियाणे पुरविण्याचे नियोजन केले आहे. सध्या पाच लाख ५७ हजार ९८९ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. या हंगामात कडधान्यांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना गेल्या वर्षाच्या तुलनेत २५ ते ३० टक्के कमी दराने बियाणे मिळणार आहे.  

अकोला : आगामी हंगामाच्या दृष्टीने महाबीजने सुमारे पाच लाख ९७ हजार ७७४ क्विंटल बियाणे पुरविण्याचे नियोजन केले आहे. सध्या पाच लाख ५७ हजार ९८९ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. या हंगामात कडधान्यांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना गेल्या वर्षाच्या तुलनेत २५ ते ३० टक्के कमी दराने बियाणे मिळणार आहे.  

बीटी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुभार्व झाल्याने यावर्षी हे क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन व इतर पिकांचे क्षेत्र वाढू शकते. आगामी हंगामासाठी केलेल्या नियोजनानुसार १५ वर्षांअातील सोयाबीनचे ५४ हजार ५४० क्विंटल आणि १५ वर्षांवरील तीन लाख ९५ हजार ४६० क्विंटल असे एकूण चार लाख ५० हजार क्विंटल बियाणे नियोजन आहे. मात्र सध्या महाबीजकडे सोयाबीनचे चार लाख ३० हजार क्विंटल हे बियाणे उपलब्ध आहे. २० हजार क्विंटलची तूट असून ती ई-निविदा काढून बियाणे खरेदी करीत भरून काढावी लागणार आहे.  

महाबीजच्या सोयाबीन बियाण्याचा मुख्य स्त्रोत मध्य प्रदेश आहे. या राज्यात गेल्या हंगामात सोयाबीन बीजोत्पादनाला मोठा फटका बसला होता. यामुळे महाबीजकडे सोयाबीन बियाण्याची सुमारे २० हजार क्विंटलची तूट आली आहे. ही तूट भरून काढत राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी महाबीज ई-निविदा काढून खरेदी करेल, अशी महाबीजच्या सूत्रांनी सांगितले. राष्ट्रीय तेलताड योजनेअंतर्गत बियाण्यासाठी शेतकऱ्यांना बियाण्याच्या कालावधी (वर्षे)वरून अनुदान दिले जाईल.

येत्या हंगामात महामंडळाद्वारे ग्रामबिजोत्पादन योजना सोयाबीन व भात बियाण्यासाठी राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तो मंजूर झाल्यानंतर त्याचाही लाभ शेतकऱ्यांना दिला जाईल.

कडधान्याचे बियाणे दर घसरले
कडधान्यांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाबीजचे बियाणे सुमारे २५ ते ३० टक्के कमी दराने उपलब्ध होणार आहे. बाजारपेठेत मिळणाऱ्या दरांवर बियाण्याचे दर निश्चित होत असतात. तूर, उडीद, मूग या धान्यांचे दर बाजारात कमी असल्याने बियाणे दर निश्चिती करताना ते गृहीत धरून आगामी हंगामासाठी या वाणांचे दर निश्चित केले आहेत.
 

बियाणे उपलब्धता
सोयाबीन ४५००००
तूर १६५४५
उडीद २०४५५
मूग ७०३१
सं. ज्वारी १०७०५
सु. बाजरी १५७३
धान ६३०६०
सं. धान ५७५
सं. मका ७५००
एकूण ५९७७७४

 

इतर अॅग्रो विशेष
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्दसावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...
बांबू उद्योगात भारताला स्वयंपूर्ण...मुंबई: कागद, कागदाचा लगदा, वस्त्र या विविध...
लाँग मार्च पोलिसांनी रोखला; आज कूच...नाशिक: मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय...
चटका वाढल्याने उन्हाळ्याची चाहूलपुणे : राज्यातील थंडी कमी होऊन उन्हाचा चटका...
निविष्ठांबाबत शासन कठोर: चंद्रकांत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे,...
हमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात...जळगाव ः कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे...
मराठवाड्यातील भूजल रसातळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील भूजलाची पातळी झपाट्याने...
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...