agriculture news in Marathi, six sugar factories shut down, Maharashtra | Agrowon

सहा कारखान्यांची धुराडी थंडावली
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मार्च 2019

औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच जिल्ह्यांतील यंदाच्या गाळप हंगामात सहभाग घेतलेल्या २३ साखर कारखान्यांपैकी सहा साखर कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत. त्यामध्ये बीड, नंदुरबारमधील प्रत्येकी दोन, तर जालना व जळगावमधील प्रत्येकी एका कारखान्याचा समावेश आहे. 

औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच जिल्ह्यांतील यंदाच्या गाळप हंगामात सहभाग घेतलेल्या २३ साखर कारखान्यांपैकी सहा साखर कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत. त्यामध्ये बीड, नंदुरबारमधील प्रत्येकी दोन, तर जालना व जळगावमधील प्रत्येकी एका कारखान्याचा समावेश आहे. 

यंदाच्या ऊस गाळप हंगामात औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील प्रत्येकी पाच, बीडमधील सात, जळगाव व नंदूरबारमधील प्रत्येकी तीन साखर कारखान्यांचा समावेश होता. सर्व २३ साखर कारखान्यांनी २१ मार्चअखरेपर्यंत ८२ लाख १४ हजार ९२८ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.४४ टक्‍के साखर उताऱ्याने ८५ लाख ७५ हजार ७१८ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. नंदुरबार जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी  ९ लाख ९९ हजार १०८ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.४ टक्‍के साखर उताऱ्याने १० लाख ३९ हजार १४२ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. 
जवळपास साडेचार महिने चाललेल्या गाळप हंगामानंतर नंदुरबारमधील सातपुडा तापी व आदिवासी सहकारी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अनुक्रमे १० व २० मार्चला गुंडाळला आहे. 

जळगाव जिल्ह्यात यंदा तीन साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला. या कारखान्यांनी ४ लाख ५१ हजार ९०७ टन उसाचे गाळप करत सरासरी ९.८१ टक्‍के साखर उताऱ्याने ४ लाख ४३ हजार ३२१ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. या तीन कारखान्यांपैकी संत मुक्‍ताबाई शुगर ॲँड एनर्जी या १ नोव्हेंबर २०१८ ला गाळप सुरू झालेल्या कारखान्याचा हंगाम १७ मार्चला आटोपला आहे. जालना जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी १९ लाख ७६ हजार ७४ टन उसाचे गाळप करत सरासरी ११.०१ टक्‍के साखर उताऱ्याने २१ लाख ७६ हजार ११० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. या पाच कारखान्यांपैकी रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम १९ फेब्रुवारीलाच उरकला आहे. 

बीड जिल्ह्यातील सात कारखान्यांनी यंदा ३२ लाख ५४ हजार ६१२ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.०५ टक्‍के साखर उताऱ्याने ३२ लाख ७० हजार २१० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. या सात साखर कारखान्यांपैकी जय महेश एनएसएल व अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम अनुक्रमे १९ व ३ मार्चला गुंडाळला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी १५ लाख ३३ हजार २२५ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.७४ टक्‍के साखर उताऱ्याने १६ लाख ४६ हजार ९३५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
राजगुरुनगरचा आदर्शराजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयाला...
पीक कर्जवाटपाचा मुहूर्त टळणार?या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आल्याने आणि मे...
फळबाग वाचविण्यासाठी सलाइनद्वारे पाणी जिंतूर, जि. परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या...
सिन्नर तालुक्यात दुष्काळाने डाळिंब...नाशिक  : पाऊस कमी झाल्याने संपूर्ण सिन्नर...
विदर्भात उष्णतेची लाटपुणे ः मराठवाडा ते उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण मध्य...
शेडनेटगृह अनुदानाचे राज्यस्तरीय दरपत्रक...पुणे : धोरणात्मक कामकाजापासून शेतकरी प्रतिनिधींना...
स्ट्राॅबेरीची बाजारपेठ होतेय अधिक सक्षम महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी...अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा...
पावणेतीन हजार कोटींची ‘वसुंधरा’त...पुणे : कृषिविस्तार व सल्ला देण्याचे काम सोडून...
कांदा संचालनालयाला राष्ट्रीय संस्थेचा...पुणे : राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण...
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान...दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना...
राज्यात उष्णतेची लाट येणारपुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...