agriculture news in marathi, Sixty lakh compensation for last year rain affected farmers | Agrowon

गेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची मदत जाहीर
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 डिसेंबर 2018

मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात राज्याच्या काही भागात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीतील नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. एक हजार हेक्टरवरील नुकसानीपोटी सुमारे साठ लाख रुपये वितरित करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 

मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात राज्याच्या काही भागात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीतील नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. एक हजार हेक्टरवरील नुकसानीपोटी सुमारे साठ लाख रुपये वितरित करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 

गेल्या वर्षी मार्च महिन्यात राज्याच्या काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीपिकांचे नुकसान झाले होते. सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, यवतमाळ आदी जिल्ह्यांत हे नुकसान झाले होते. या जिल्ह्यातील सुमारे एक हजार हेक्टरवरील क्षेत्राचे यात नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी सर्व विभागीय आयुक्तांकडून मागवण्यात आली होती. त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या निधी मागणीच्या प्रस्तावानुसार हा निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यानुसार सुमारे साठ लाख रुपये नुकसानभरपाई वितरित केली जाणार आहे. 

महसूल व कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे. मदतीची ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात यावी, कोणत्याही शेतकऱ्यांना रोख अथवा निविष्ठा स्वरूपात मदत देण्यात येऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच थेट रक्कम जमा करताना मदतीच्या रकमेतून बँकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करू नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. मदत आणि पुनर्वसन विभागाने नुकताच यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.

इतर अॅग्रो विशेष
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...