कर्जमाफी अर्जांची साठ टक्के छाननी झाली पूर्ण
मारुती कंदले
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

राज्यातील ८९ लाख कर्जदार शेतकऱ्यांचा दावा खोटा ठरला असून, राज्य सरकारने जाहीर केलेला ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीचा आकडाही घटण्याची शक्यता आहे.

मुंबई ः शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रियेच्या छाननीचे साठ टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले असून, येत्या आठवड्यात छाननी पूर्ण होईल असा अंदाज आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या- दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर कर्ज वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती सहकार खात्यातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

कर्जमाफीसाठी २२ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात आले. याकाळात सुमारे ५६ लाख ५८ हजार ३९३ शेतकरी कुटुंबीयांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी २ लाख ४१ हजार ६२८ शेतकऱ्यांचे अर्ज आधारलिंक नाहीत. कर्जमाफीसाठी सरकारने अर्जदार शेतकऱ्यासह त्याची पत्नी आणि अठरा वर्षांखालील मुले अशी कुटुंबाची व्याख्या केली, त्यामुळे शेतकऱ्यांसोबत त्यांच्या पत्नींचेही अर्ज भरून घेण्यात आले.

पती आणि पत्नी अशी शेतकरी नोंदणी झाली असल्याने ऑनलाइन शेतकरी कुटुंबांच्या अर्जांचा आकडा ५६ लाख ५८ हजारांवर गेला. यांत कर्जदार शेतकरी महिला खातेदारांची संख्या लक्षणीय असून, असे सुमारे दहा लाख खातेधारक वाढून एकूण कर्जदारांची संख्या ६६ लाखांवर जाईल असा अंदाज आहे.

या सर्व अर्जदारांच्या छाननीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, सोमवारअखेर त्यापैकी साठ टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या आठवड्याभरात छाननीचे काम पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. सध्या राज्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने तयार केलेले सॉफ्टवेअर आणि सहकार विभागाच्या लेखापरीक्षकांकडून अशा द्विस्तरावर छाननीचे हे काम केले जात आहे.

तसेच, सहकार विभागाने बँकांकडूनही शेतकरी कर्जाबद्दलची माहिती मागवली होती. ६६ रकान्यांचा अर्ज बँकांकडून भरून घेतला जात आहे. ही माहितीसुद्धा येत्या आठवड्याभरात सहकार खात्याला प्राप्त होईल, असे सांगण्यात आले. या दोन्ही माहितींची खातरजमा करून ऑक्टोबरच्या पहिल्या- दुसऱ्या आठवड्यात कर्ज वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होईल, असा अंदाज आहे.

... तर बँकांवर कारवाईचे अस्त्र
कर्जमाफीमध्ये सुमारे १५ ते १७ लाख खातेदारांचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याचे चित्र आहे. या संदर्भात सहकार खात्याने आक्रमक भूमिका घेतली असून, त्यावरून बँकांवर कारवाईचे अस्त्र उगारले जाण्याची शक्यता आहे. ‘अॅग्रोवन’ने गेल्याच आठवड्यात अशा बनावट खातेधारकांच्या अनुषंगाने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे राज्यातील ८९ लाख कर्जदार शेतकऱ्यांचा दावा खोटा ठरला असून, त्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेला ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीचा आकडाही घटण्याची शक्यता आहे.

दावा खोटा, कर्जमाफीचा आकडाही घटणार
राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने राज्यात ८९ लाख कर्जदार असल्याची माहिती दिली होती. प्रत्यक्षात, कर्जमाफीसाठी पुरुष आणि महिला शेतकऱ्यांचे ६६ लाख खातेदारांचे अर्ज आले आहेत. नोकरदार शेतकरी असलेल्या सुमारे सहा लाख कर्जदारांनी कर्जमाफीसाठी अर्ज केलेले नाहीत. अशी एकंदर ७२ लाख खातेदारांची माहिती पुढे आली आहे.

मात्र, उर्वरित सुमारे १५ ते १७ लाख खातेदारांचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याचे समजते. त्यामुळे राज्यातील ८९ लाख कर्जदार शेतकऱ्यांचा दावा खोटा ठरला असून, राज्य सरकारने जाहीर केलेला ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीचा आकडाही घटण्याची शक्यता आहे.

हे शेतकरी नेमके कोण?
कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्यांमध्ये मुंबई आणि मुंबई उपनगरातील कर्जदारांची संख्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. मुंबईतील २३ हजार ४९४ आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील १ हजार ५०३ इतक्या कर्जदारांनी कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे हे शेतकरी नेमके कोण, अशी चर्चा रंगली आहे.

इतर अॅग्रो विशेष
खुल्या शेतीतील गुलाब लागवड तंत्रज्ञान गुलाबाच्या फुलांचा उपयोग...
ज्ञानाचा प्रकाशदिवाळी... प्रकाशाचा, उत्साहाचा सण! सारी दुखं...
साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...जळगाव ः जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...
पोषक तत्त्वांनीयुक्त खजूर, अक्रोड, काजूपोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीने अक्रोड अाणि...
रब्बी हंगामासाठी कांदा जाती अन्‌...महाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या...
बाजरी चारा पीक लगवड तंत्रज्ञान बाजरी हे पीक पालेदार, रसाळ, गोड व मऊ असते....
जळगाव जिल्ह्यात दादर ज्वारी तरारली जळगाव  ः खानदेशात यंदा परतीच्या पावसामुळे...
कांद्यावर डिसेंबरपर्यंत 'स्टॉक लिमिट'नवी दिल्ली : नफेखोरपणा, साठेबाजी, वाढते दर आणि...
सांगली जिल्ह्यात भाजपच्या वारुला ब्रेकसांगली ः लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत...
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...