साठ हजार संत्रा उत्पादकांना फळगळीचा मोठा फटका
साठ हजार संत्रा उत्पादकांना फळगळीचा मोठा फटका

साठ हजार संत्रा उत्पादकांना फळगळीचा मोठा फटका

अमरावती : वातावरणातील बदल, रषशोषक किडींचा प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यात झालेल्या संत्रा फळगळीचे सर्व्हेक्षण प्रशासनाकडून पूर्णत्वास गेले आहे. ५४ हजार हेक्‍टरमध्ये फळगळ झाल्याचे निरीक्षण असले तरी यातील केवळ ३८ हजार हेक्‍टर क्षेत्रामधील नुकसानच ३३ टक्‍क्‍यांवर म्हणजे मदतीस पात्र असल्याचे सांगत तसा अहवाल सरकारला पाठविण्यात आला आहे.  वातावरणातील बदलाचा फटका अमरावती व नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांना नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणावर बसत आहे. या वर्षी आंबीया बहार घेणाऱ्या संत्रा उत्पादकांना फळगळीचा मोठा सामना करावा लागला. एकट्या अमरावती जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. नागपूर जिल्ह्यातदेखील नुकसानीची तीव्रता अशीच होती. संत्रा उत्पादक दोन्ही मुख्य जिल्ह्यांसह उर्वरित जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी संत्रा घेतला जातो त्या जिल्ह्यातील उत्पादकही फळगळीमुळे हवालदील झाले, परंतु उर्वरित सर्व जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांना वाऱ्यावर सोडत केवळ अमरावती जिल्ह्यात आंबीया बहारातील नुकसानीच्या सर्व्हेक्षणाचे आदेश देण्यात आले. 

असे झाले नुकसान जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ७ डिसेंबर २०१७ रोजी संयुक्‍त पंचनाम्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ५३ हजार ३९२ हेक्‍टरमध्ये नुकसान झाल्याचे निरीक्षण सर्व्हेक्षणात नोंदविण्यात आले. यापैकी ३३ टक्‍क्‍यांवर नुकसान झालेले क्षेत्र ३८ हजार १४१.७७ हेक्‍टर इतकेच आहे. ११३६ गावांतील ५९ हजार ९५६ शेतकऱ्यांचे ५३ हजार ६१२ हेक्‍टर नुकसान झाले. 

तालुकानिहाय ३३ टक्‍क्‍यांवरील नुकसान  (हेक्‍टरमध्ये)

अमरावती ८३७
भातकुली ३२.१४
चांदूर रेल्वे १३१३.०९
नांदगाव खंडेश्‍वर ३९३.४३
धामणगाव रेल्वे ः १६३४.९६
मोर्शी ८४५२
वरुड ८०३६.७८
तिवसा १०६९.९३
चांदूर बाजार १०४३७.१८
अचलपूर  ४४०२.३६
अंजनगावसूर्जी ५२९.७
चिखलदरा ३.५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com