agriculture news in marathi, Slight improvement in onion rates; | Agrowon

जळगाव : कांदा दरात किंचित सुधारणा, आवकेत घट
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 एप्रिल 2019

जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळ लाल कांद्याची आवक वाढलेली नाही. दरात क्विंटलमागे ५० ते ६० रुपयांनी सुधारणा झाली आहे. काही बाजारांमध्ये किमान दरातही बऱ्यापैकी वाढ झाली आहे. कांद्याचे कमाल ८५०, तर किमान दर ४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे असल्याची माहिती मिळाली. 

जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळ लाल कांद्याची आवक वाढलेली नाही. दरात क्विंटलमागे ५० ते ६० रुपयांनी सुधारणा झाली आहे. काही बाजारांमध्ये किमान दरातही बऱ्यापैकी वाढ झाली आहे. कांद्याचे कमाल ८५०, तर किमान दर ४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे असल्याची माहिती मिळाली. 

जळगाव, किनगाव (ता. यावल), अडावद (ता. चोपडा), चाळीसगाव, धुळे, साक्री (जि. धुळे) येथील बाजारात कांद्याची आवक रखडत सुरू आहे. अनेक भागांत आगाप उन्हाळ कांद्याची काढणी सुरू आहे. परंतु, शेतकरी लगेच कांदा बाजारात आणत नसल्याची स्थिती आहे. त्यांना अपेक्षित दरांची प्रतीक्षा आहे. जळगाव बाजार समितीत प्रतिदिन ५०० क्विंटल लाल कांद्याची आवक मागील तीन-चार दिवसांत झाली. पुणे, नगर येथील कांद्याची आवक अजून या बाजारात नाही. 

साक्री, पिंपळनेर व धुळे येथील बाजारात प्रतिदिन १०००, अडावद व किनगाव येथील बाजारात ४०० क्विंटलपर्यंतची आवक होत आहे. चाळीसगाव येथील बाजारातही दोन-तीन दिवसच आवक अधिक होत आहे. पांढऱ्या कांद्याची धुळे, जळगावात नगण्य आवक आहे. जळगावात दर शनिवारी पांढऱ्या कांद्याची आवक मध्य प्रदेश व यावल, सिल्लोड, सोयगाव (जि. औरंगाबाद) भागांतून होते. पांढऱ्या कांद्याचे दर प्रतिक्विंटल ९००, लाल कांद्याचे दर मागील आठवड्यात ८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. किमान दर ३०० रुपयांपर्यंत होते.

किमान व कमाल दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. यावल, जळगाव भागांत काढणी वेगाने सुरू नाही. त्यास वेग आल्यानंतर बाजारातील आवक वाढेल, असे सांगण्यात आले.

इतर बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
पुण्यात कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरचीचे दर...पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ५०० ते ३०००...साताऱ्यात १५०० ते २००० रुपये सातारा येथील...
जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ७०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिकमध्ये ढोबळी मिरचीची आवक १६३...
सोलापुरात कांदा दरात किंचित सुधारणासोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे बाजार समितीत श्रावण घेवडा,...पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राजस्थान, मध्य प्रदेशातून गव्हाच्या...जळगाव : बाजार समितीमधील किरकोळ व घाऊक विक्रेते,...
परभणीत काकडीला प्रतिक्विंटल ७०० ते १५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात लिंबू प्रतिक्विंटल ८०० ते ६०००...जळगावात २४०० ते ४००० रुपये  जळगाव : कृषी...
कोल्हापुरात टोमॅटोला प्रति दहा किलोस ५०...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सोलापुरात मेथी, शेपूला उठाव, दरात...सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळीच्या दरात ६० रुपयांनी...जळगाव  ः खानदेशात केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मानवत बाजार समितीत उद्यापासून हळद खरेदीमानवत, जि. परभणी ः मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार...
अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याला मागणीपुणे ः मंगळवारी (ता. ७) साजऱ्या होणाऱ्या अक्षय...
औरंगाबादेत आंबा ४ हजार ते १० हजार रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत शेवग्याला प्रतिक्विंटल १५०० ते...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात काकडी प्रतिक्विंटल ५०० ते १९००...अकोल्यात प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये अकोला ः...