agriculture news in marathi, slow Action for extension of Jalgaon Market Committee | Agrowon

जळगाव बाजार समितीच्या विस्ताराची कार्यवाही थंडच
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

जळगाव : जिल्ह्यात प्रमुख बाजार समित्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विस्तारासंबंधीची कार्यवाही संथच आहे. नवीन बाजार समितीसाठी जमीन खरेदी, जमीन मोजणी याबाबतची प्रक्रियाच सुरू नसल्याची माहिती आहे.

जळगाव : जिल्ह्यात प्रमुख बाजार समित्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विस्तारासंबंधीची कार्यवाही संथच आहे. नवीन बाजार समितीसाठी जमीन खरेदी, जमीन मोजणी याबाबतची प्रक्रियाच सुरू नसल्याची माहिती आहे.

जळगाव बाजार समिती सध्या औद्योगिक वसाहतीनजिक आहे. नागपूर - धुळे महामार्ग व औरंगाबाद - जळगाव राज्य मार्गावर ही बाजार समिती आहे. सद्यःस्थितीत बैलगाडी या बाजार समितीपर्यंत पोचायला अनेक तास लागतील, एवढी वाहतूक कोंडी असते. यामुळे बाजार समितीच्या विस्ताराची चर्चा तीन वर्षांपूर्वी सुरू झाली
.
 जळगाव शहरानजीक मन्यारखेडा व खेडी बुद्रुक शिवारात १९ एकर जमीन खरेदी करायचा प्रस्ताव तत्कालीन सभापती संतोष नारखेडे यांनी ठेवला. ही प्रक्रिया सुरू होत असतानाच सभापती बदलले. लक्ष्मण पाटील हे सध्या सभापती आहेत. बाजार समितीत सुमारे १०२ कर्मचारी असून, त्यांचे वेतन व इतर खर्चासाठी उत्पन्न वाढीची सर्कस करण्यातच संचालकांचा अधिकचा वेळ खर्च होत आहे. यामुळे बाजार समितीच्या विस्तारासाठी नव्या जागेची खरेदी व इतर कार्यवाहीच ठप्प झाली आहे.

विस्तारीत बाजार समितीत फळे व भाजीपाला मार्केट यार्ड आणि धान्य मार्केटच उभारण्यासंबंधी आराखडा तयार केला होता. दुकाने दीर्घ मुदतीने भाडेकरारावर द्यायची, तोलकाटा, शेतकरी निवास, पशुधनाला पाणी पिण्यासाठी हाळ आदी व्यवस्था करायची योजना त्यात आहे. नवी प्रस्तावित बाजार समिती हीदेखील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा (नागपूर - धुळे) वर आहे. परंतु या बाजार समितीपर्यंत जाताना वाहतूक कोंडीचा अधिक सामना करावा लागणार नाही. शिवाय पुढील काही वर्षांत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भुसावळ - जळगावदरम्यान सिमेंटचा चौपदरी रस्ता होणार असल्याने वाहतूक आणखी सुकर होईल, असे सांगितले जाते.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
जळगावात डाळिंब प्रतिक्विंटल २००० ते...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ`...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून...
निवडणूक अायोगाच्या बोधचिन्हाची मानवी...बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारात पाच हजार...
ऊसदर नियामक मंडळाची ‘आरएसएफ’प्रश्नी...पुणे : राज्यातील काही साखर कारखान्यांकडून महसुली...
राज्यात उन्हाचा चटका कायमपुणे   : कोरड्या व निरभ्र हवामानामुळे...
खानदेशात सूतगिरण्यांची वानवाजळगाव  ः खानदेशात कापूस हे प्रमुख पीक आहे....
दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त कशाला...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील ७६ पैकी ५६ तालुक्‍...
सिंचन परिषदेतील विचार मंथनाची दिशा...सोयगाव, जि. औरंगाबाद   : केवळ चर्चा, प्रबोधन...
स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा...फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे...