agriculture news in marathi, The slow pace of loan interest in four districts of Marathwada | Agrowon

मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत कर्जवाटपाची गती संथ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 जून 2018

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा जूनअखेरपर्यंत खरीप पीककर्ज वाटपाची आशा धूसरच असल्याचे चित्र आहे. औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत केवळ १०.८८ टक्‍केच कर्जवाटपाची उद्दिष्टपूर्ती बॅंकांनी केली आहे. त्यातही सर्वाधिक कर्जवाटपाची जबाबदारी असलेल्या व्यापारी बॅंकांचा हात प्रचंड आखडता आहे. मिळालेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत व्यापारी बॅंकांनी केवळ ६.३० टक्‍केच कर्जवाटप केले आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा जूनअखेरपर्यंत खरीप पीककर्ज वाटपाची आशा धूसरच असल्याचे चित्र आहे. औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत केवळ १०.८८ टक्‍केच कर्जवाटपाची उद्दिष्टपूर्ती बॅंकांनी केली आहे. त्यातही सर्वाधिक कर्जवाटपाची जबाबदारी असलेल्या व्यापारी बॅंकांचा हात प्रचंड आखडता आहे. मिळालेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत व्यापारी बॅंकांनी केवळ ६.३० टक्‍केच कर्जवाटप केले आहे.

कर्जमाफीचे रडतगाऱ्हाणे सुरूच असताना शासनाकडून इतक्‍या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिल्याचे आकडे दिले जात आहेत. ज्या शेतकऱ्यांचा शासनाने कर्जमाफीत अंतर्भाव केला, त्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळते का, तर याचे उत्तर नाही, असेच आहे. शाखानिहाय वेगवेगळ्या सबबी सांगून कर्जमाफी व कर्जवाटपाचा संभ्रम दूर करण्याचे काम होत नसल्याचीच स्थिती आहे.

मराठवाड्यातून कोणत्याच जिल्हाधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेतल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे शासन व प्रशासनाकडून न वाढणाऱ्या कर्जवाटपाच्या टक्‍क्‍यांविषयी, कर्जमाफीत बसलेल्या मात्र नव्याने कर्ज न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, यासाठी काय पावले उचलली जात आहेत हे कळायला मार्ग नाही. केवळ आढावा बैठका घेऊन गरजवंत शेतकऱ्यांना कर्जाचा वेळेत पुरवठा केला जाणार आहे का, असा सवालही आता शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे. प्राप्त माहितीनुसार औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत यंदा खरीप पीककर्ज वाटपासाठी ४८३२ कोटी ५३ लाख ६० हजार रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. २५ जूनअखेरपर्यंत चारही जिल्ह्यांतील जिल्हा सहकारी, व्यापारी व ग्रामीण बॅंकांच्या शाखांनी केवळ १०.८८ टक्‍केच उद्दिष्टपूर्ती केली आहे.

जिल्हानिहाय खरीप कर्जवाटप उद्दिष्ट व प्रत्यक्ष वाटप (२५ जूनअखेर)
जिल्हा कर्जवाटपाचे उद्दिष्ट प्रत्यक्ष कर्जवाटप
औरंगाबाद ११५९ कोटी ४८ लाख ७० हजार २०१ कोटी ५९ हजार
जालना १२४३ कोटी ६० लाख ७८ हजार १७६ कोटी ७१ लाख ९६ हजार
परभणी १४७० कोटी ४४ लाख १२ हजार ९७ कोटी २९ लाख ७४ हजार
हिंगोली ९५९ कोटी ५० कोटी ८१ लाख ७ हजार

 

इतर बातम्या
खानदेशात तूर खरेदीबाबत ऑफलाइन नोंदणी...जळगाव ः खानदेशात तूर खरेदीसंबंधी शासकीय...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...