agriculture news in marathi, slow trading affects soyaben farmers in jalgon market committee | Agrowon

जळगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचा सोयाबीन राहतोय पडून
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 डिसेंबर 2017

लिलाव प्रक्रिया सुरू आहे. परंतु लिलावात कमी दर असला तर शेतकरी आपला शेतमाल घरी घेऊन जाऊ शकत नाहीत. कारण त्यांना पुन्हा वाहतूक खर्च करावा लागतो. त्यामुळे ते बाजारातच सोयाबीन किंवा इतर धान्य ठेवतात. जे दर आहेत तेच शेतकऱ्यांचा दिले जातात. अडवणूक कुठेही नाही. 

- लक्ष्मण पाटील, सभापती, जळगाव बाजार समिती.
जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठा गाजावाजा करून सुरू झालेली धान्य लिलाव प्रक्रिया जवळपास ठप्प झाली आहे. बाजार समितीत सोयाबीनचे दर तीन हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत, परंतु सौदे होत नसल्याने शेतकऱ्यांचा सोयाबीन बाजार समितीमध्ये पडून राहत असल्याची माहिती आहे. 
 
ऑक्‍टोबर महिन्यात बाजार समितीत आवक झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा जाहीर लिलाव सुरू झाला. लिलाव नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत बऱ्यापैकी सुरू होते. परंतु अलीकडे लिलावांना प्रतिसाद कमी झाला आहे. त्यामुळे शेतकरीही लिलावात फारसे धान्य आणत नाहीत.
 
काही अडतदारांनी मिळून लिलाव प्रक्रियेत खरेदी न करण्याचा प्रकार केला व नंतर लिलावांना प्रतिसादच कमी झाल्याची कुरबूर बाजार समितीमध्ये आहे. सध्या सोयाबीनचीच अधिक विक्री होत आहे. परंतु लिलावात मोजकाच सोयाबीन काही व्यापारी खरेदी करीत आहेत. अशात सोयाबीनचे दर तीन हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊनही सौदे होत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
 
असाच प्रकार सुरू राहिला तर लिलाव प्रक्रिया पुढील महिनाभरात ठप्प होईल व पूर्वीप्रमाणे अडतदारांकडे थेट धान्य पोचविण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय राहणार नाही, असे शेतकरी संघटनेचे अजय बसेर म्हणाले. 
 
बाजार समितीत मागील महिन्यातच नवे सभापती म्हणून लक्ष्मण पाटील यांच्याकडे सूत्रे आली आहेत. आता लिलाव पद्धतीत लक्ष घालायचे तर अडतदार नाराज होतील आणि लिलाव प्रक्रिया ठप्प झाली तर शेतकऱ्यांचा शेतीमाल वेळेत विक्री न होणे, अडतदारांकडे अडवणूक असे प्रकार होतील. अशातच बाजार समितीत व्यापारी संघटनेचा प्रभाव असल्याने थेट वरिष्ठ नेत्यांकडे याची तक्रार जाईल म्हणून या प्रकरणात सभापती पाटील यांचेही हात बांधले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. 
 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन लिलाव प्रक्रियेत कमी दरात मागितला जातो. त्यामुळे तो चांगले दर मिळतील तेव्हा विकू म्हणून शेतकरी सोयाबीन घरी परत नेण्याऐवजी अडतदारांकडेच ठेवतात. असा अनेक शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन अडतदारांकडे ठेवला आहे. त्याचे सौदे होत नसून प्रचलित दरांपेक्षा कमी दर देण्याचा प्रकार बाजार समितीत सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...