जळगाव जिल्ह्यात `किसान सन्मान`च्या कामाला कासवगती

 जळगाव जिल्ह्यात `किसान सन्मान`च्या कामाला कासवगती
जळगाव जिल्ह्यात `किसान सन्मान`च्या कामाला कासवगती

जळगाव  : केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थी निवडण्याची प्रक्रिया २६ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करणे शक्‍य नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. अर्थातच या योजनेसंबंधी लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती संकलनाचे कामच धीम्या गतीने सुरू आहे. शेतकरी तलाठी, ग्रामसेवकांकडे चकरा मारत आहेत. 

लाभार्थी शेतकरी निवडीचा कार्यक्रम तयार केला आहे. त्यात कुटुंबनिहाय वर्गीकरण करून खात्री करण्यासाठी १० ते १२ फेब्रुवारी या तारखा निश्‍चित केल्या होत्या. शुक्रवारपासून (ता. १५)  यादी गावात प्रसिद्ध करून हरकती मागविल्या जातील. २० तारखेपर्यंत हरकती घेतल्या जातील. मग याद्या दुरुस्त करून अंतिम यादी तयार करण्यासाठी २१ फेब्रुवारी ही मुदत आहे. या याद्या संकेतस्थळावर अपलोड करण्याची कार्यवाही २२ ते २६ फेब्रुवारीदरम्यान करायची आहे. परंतु संभाव्य लाभार्थी माहितीच अजून संकलित झालेली नाही. तलाठी व ग्रामसेवक एकमेकांवर हे काम ढकलत आहेत. 

जिल्ह्यात अल्प, अत्यल्प (दोन एकरच्या आतच) शेतकऱ्याची संख्या ३ लाख ६७ हजार २७५, अत्यल्प भूधारक १ लाख ९४ हजार ४५७, तर अल्प भूधारकांची १ लाख ७२ हजार ८१८ इतकी आहे. विविध अटी, निकषांमुळे किसान सन्मान निधी योजनेसाठी अपात्र ठरणार आहे. यामुळे जिल्ह्यात जेमतेम दीड लाखापर्यंत योजनेचे लाभार्थी असू शकतील.

महसूल यंत्रणेकडे काम जिल्ह्यातील महसूल यंत्रणेला हे काम देण्यात आले आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी लाभार्थी संख्या निश्‍चित करण्यास सांगितले आहे. दोन हेक्‍टरपेक्षा कमी शेती असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. वर्षभरात तीन वेळा दोन दोन हजारांची मदत थेट बॅंकेत मिळणार आहे. परंतु कामच संथगतीने सुरू असल्याने मदत, केव्हा बॅंक खात्यात जमा होईल, हा प्रश्‍न आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com