agriculture news in marathi, small and marginal farmers are more important in food security | Agrowon

अन्नसुरक्षेत लहान शेतकरीच महत्त्वाचा
वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

मिलान, इटली : जगभरातील ९० टक्के शेतकरी लहान व अल्पभूधारक अाहेत. ८० टक्के अन्न उत्पादनात त्यांचा वाटा असल्याने हेच शेतकरी अन्न सुरक्षा व शाश्वत विकासासाठी महत्वाचे आहे. नावीन्यता आणि तरुण वर्गाचा शेतीमधील सहभाग केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा निर्धार येथे करण्यात आला. 

मिलान, इटली : जगभरातील ९० टक्के शेतकरी लहान व अल्पभूधारक अाहेत. ८० टक्के अन्न उत्पादनात त्यांचा वाटा असल्याने हेच शेतकरी अन्न सुरक्षा व शाश्वत विकासासाठी महत्वाचे आहे. नावीन्यता आणि तरुण वर्गाचा शेतीमधील सहभाग केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा निर्धार येथे करण्यात आला. 

जागतिक फुड इन्होवेशन समिटचे ७ ते १० मे दरम्यान आयोजन करण्यात आले होते. परिषदेचे उद्‌घाटन अमेरिकेचे माजी परराष्ट्र सचिव जॉन केरी केली. श्री. केरी यांनी पोषणतत्त्व सुरक्षा, अपारंपरिक ऊर्जा तंत्रज्ञान आणि हवामान बदल या विषयांच्या अनुषंगाने छोट्या शेतकऱ्यांना साह्य करून शाश्वत विकासाची उद्दिष्ट गाठण्याचे आव्हान केले.

या परिषदेत प्रथमच शेतकऱ्यांवर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. नेदरलँड्सच्या प्रिन्सेस व्हिक्टोरिया यांच्या नेतृत्वाखाली भारत, सुदान, अल्जेरिया, होंडोरस, दक्षिण आफ्रिका, अमेरिका येथील शेतकऱ्यांचा समावेश असणाऱ्या विशेष शिष्टमंडळाने ‘भविष्यातील शेती आणि बदल'' या सत्रात आपला सहभाग नोंदविला. शिष्टमंडळातील भारतीय शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व महाएफपीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांनी केले. या वेळी नेदरलँड्सच्या उपपंतप्रधान क्ररोला स्काउटेन, IFAD चे अध्यक्ष गिल्बर्ट होंबो, तसेच एफएओ, WFP ( World Food Program ) यांचे प्रमुख पदाधिकारी व या क्षेत्रात काम करणारे जगभरातील मान्यवर उपस्थित होते.

यानंतर या शिष्टमंडळाने व्हॅटीकन सिटी येथे पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली आणि पोप यांनी लाखोंच्या समुदायाला संबोधित करताना या शिष्टमंडळाचा विशेष उल्लेख करून जगाचे पोशिंदे असणाऱ्या लहान लहान व छोट्या शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि शुभेच्छा व आशीर्वाद दिले. रोम येथील IFAD ( International Fund For Agriculture Development) च्या मुख्य कार्यालयात शिष्टमंडळाचे परिषदेमधील अनुभव कथन व आंतरराष्ट्रीय समुदायाकडून असणाऱ्या अपेक्षा यावर चर्चा करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी, विविध देशांतील राजदूत कार्यालयातील कृषी अधिकारी चर्चेत सहभागी झाले होते.

या परिषदेच्या माध्यमातून लहान व छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या, आव्हाने याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधल्याने या विषयाकडे अधिक गांभीर्याने विचार करून काम करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत तज्‍ज्ञांनी व्यक्त केले आहे.

इतर बातम्या
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
पाण्याअभावी फळबागांवर संकटअकोला : फळबागांसाठी अोळख असलेल्या अकोट तालुक्यात...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
तूर हमीभाव नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठसांगली : खरेदी केंद्रात तूर विक्रीसाठी ऑनलाइन...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...