agriculture news in marathi, Small bunds, Percolation tank repair campaign in Kolhapur: Chandrakant Patil | Agrowon

लघु बंधारे, पाझर तलाव दुरुस्तीची कोल्हापुरात मोहीम ः चंद्रकांत पाटील
टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर : जिल्ह्यातील लघु पाटबंधारे प्रकल्प, पाझर तलाव; तसेच कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष मोहीम आखण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

याचे सर्वेक्षण येत्या दोन महिन्यांत संबंधित यंत्रणांनी पूर्ण करावी. त्यानुसार दुरुस्तीसाठी आवश्‍यक तो निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा नियोजन समितीची बैठक श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात झाली, त्या वेळी ते बोलत होते.

कोल्हापूर : जिल्ह्यातील लघु पाटबंधारे प्रकल्प, पाझर तलाव; तसेच कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष मोहीम आखण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

याचे सर्वेक्षण येत्या दोन महिन्यांत संबंधित यंत्रणांनी पूर्ण करावी. त्यानुसार दुरुस्तीसाठी आवश्‍यक तो निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा नियोजन समितीची बैठक श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात झाली, त्या वेळी ते बोलत होते.

जिल्ह्यातील चार तालुक्‍यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, या तालुक्‍यातील जनतेला दुष्काळाच्या सर्व सुविधा आणि सवलती प्राधान्याने उपलब्ध करून दिल्या जातील. राज्याच्या अन्य जिल्ह्यांत दुष्काळाची गंभीरस्थिती निर्माण झाली असून, या भागातील दुष्काळग्रस्तांना सहायभूत होण्याच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यात कृषी विभागाच्या माध्यमातून चारा लागवडीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. कृषी विभागाने जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना चारा लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करावे. शेतकऱ्यांनी निर्माण केलेला चारा मार्च-एप्रिलमध्ये दुष्काळाची तीव्रता असताना शेजारच्या सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्तांच्या जनावरांसाठी उपलब्ध करून देता येईल.

बैठकीस उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार उल्हास पाटील, आमदार सत्यजित पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, पुणे विभागाचे उपायुक्त उत्तम चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत आदी उपस्थित होते.

इतर बातम्या
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
खरेदी केंद्रांएेवजी सोयाबीनची बाजारात...जळगाव : जिल्ह्यात मका व ज्वारी खरेदीसंबंधी शासकीय...
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीची आससिन्नर, जि. नाशिक : पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
सोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषण सुरूचसोलापूर : गतवर्षीच्या हंगामातील थकीत एफआरपी...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड...
कृषी क्षेत्रातील उत्पन्नाची तफावत दूर...औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांतील परिवर्तनात...
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारीनाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...