agriculture news in marathi, social activist Ronald Footing visits water conservation program in satara | Agrowon

दुष्काळाच्या हद्दपारीसाठी परदेशातूनही बळ
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 एप्रिल 2019

गोंदवले, जि. सातारा : दुष्काळ हद्दपार करण्यासाठी पेटून उठलेल्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी परदेशातूनही आता बळ मिळू लागले आहे. स्वित्झर्लंड येथील समाजसेवक रोनाल्ड फुटिंग हे सध्या माण तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांची पाहणी करत आहेत. यानंतर जलसंधारणाच्या तोंडी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास माणमधील दुष्काळी गावांना हरित करण्यासाठी मदत मिळण्याची शक्यता आहे.

गोंदवले, जि. सातारा : दुष्काळ हद्दपार करण्यासाठी पेटून उठलेल्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी परदेशातूनही आता बळ मिळू लागले आहे. स्वित्झर्लंड येथील समाजसेवक रोनाल्ड फुटिंग हे सध्या माण तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांची पाहणी करत आहेत. यानंतर जलसंधारणाच्या तोंडी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास माणमधील दुष्काळी गावांना हरित करण्यासाठी मदत मिळण्याची शक्यता आहे.

माण तालुक्‍यातून दुष्काळ कायमचा हटविण्यासाठी सध्या गावोगावी जलसंधारणाची कामे सुरू आहेत. त्यासाठी सर्व मतभेद बाजूला सारून लोक एकवटले आहेत. या सामाजिक ऐक्‍याची भुरळ केवळ भारतीयांनाच नव्हे तर परदेशी लोकांनाही पडली आहे. स्वित्झर्लंडमध्ये वकील असणारे रोनाल्ड फुटिंग सध्या माणमधील गावागावात या कामांची पाहणी करून मार्गदर्शन करत आहेत. रोनाल्ड फुटिंग यांनी यापूर्वी लोधवड्यातील ‘माती आडवा पाणी जिरवा’साठी मोठे योगदान दिले होते. याशिवाय लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपक्रमांतून मदत केली होती. पाणी अडवण्याशिवाय संपूर्ण परिसर हरित करण्यावर त्यांचा अधिक भर आहे. गेल्या १२ वर्षांपूर्वी लोधवड्यात येऊन त्यांनी यासाठी यशस्वी कामगिरी केली. 

यंदाही दुष्काळमुक्तीसाठी लोक एकत्र आल्याची माहिती रोनाल्ड फुटिंग यांना समजल्यावर ते भारतात आले आहेत. नुकतेच त्यांनी गोंदवले खुर्द, शिंदी बुद्रुक भागात सुरू असलेल्या जलसंधारण कामांना भेटी दिल्या. या कामामुळे ते समाधानी असले तरी केवळ पाणी अडविण्याशिवाय संपूर्ण दुष्काळमुक्तीसाठी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करावी, असे आवाहन रोनाल्ड फुटिंग यांनी केले आहे. लोकसहभागातून सुरू असलेल्या या कामाच्या माध्यमातून हरित गावे करण्यासाठी त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास परदेशातूनही मदतीचा ओघ सुरू होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...