agriculture news in marathi, On the social media farmer gets market price | Agrowon

सोशल मीडियावर मिळतो बाजारभाव
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 जानेवारी 2018

वाशीम : सोशल मिडीयाचा शेतकरी हितासाठी उपयोग करण्यासाठी बाजार समितीचे संचालक राजू चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे. सोशल मिडीयावर शेतकऱ्यांना नियमित ते उपलब्ध करून देत असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी आणावा किंवा नाही याविषयी निर्णय घेता येतो.

वाशीम : सोशल मिडीयाचा शेतकरी हितासाठी उपयोग करण्यासाठी बाजार समितीचे संचालक राजू चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे. सोशल मिडीयावर शेतकऱ्यांना नियमित ते उपलब्ध करून देत असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी आणावा किंवा नाही याविषयी निर्णय घेता येतो.

वाशीम बाजार समिती ही विदर्भातील मोठी आणि नावलौकिक बाजार समिती आहे. या बाजार समितीमध्ये जिल्ह्याबरोबरच शेजारी असलेल्या हिंगोली, बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातून शेतमाल विक्रीला येतो. चांगला भाव, नेट वजन आणि रोखरक्कम त्याचबरोबर बाजार समितीमधील व्यापाऱ्यांवर असलेला शेतकऱ्यांचा विश्‍वास यामुळे दरदिवसाला पाच हजार क्विंटलवर शेतमाल विक्रीस येतो.

एकमेकांना विचारुन किंवा शेतमाल विकून परतणाऱ्या वाहन चालकास दराबाबत शेतकरी पूर्वी विचारत होते. मात्र वाशीम बाजार समितीचे संचालक राजूभाऊ चौधरी यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून दोन वर्षापासून नियमित बाजारभाव उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे शेतमाल विक्रीसाठी कोठे न्यावा, याचा निर्णय शेतकऱ्यांना घेणे सुलभ झाले आहे.

शेतकऱ्यांसाठी व्हाट्स ॲप ग्रुप
वाशीम तालुक्‍यातील वाळकी माजरे येथील प्रगतशील शेतकऱ्याने व्हाट्स ॲप ग्रुप बनवून या ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारची माहिती उपलब्ध करून देत आहेत. तसेच शेतीबद्दल सल्ला, माहिती पिकांवर येणाऱ्या रोगांवर औषधी फवारण्याबाबत माहिती देत आहेत. या ग्रुपमध्ये महाराष्ट्रातील प्रगतीशील शेतकरी तसेच कृषी तज्ञांचा सहभागी असल्याने शेतकऱ्यांकडून मागविण्यात आलेल्या माहितीबाबत कृषीतज्ज्ञांकडून त्वरित माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. याचा अनेक शेतकऱ्यांना शेती करताना चांगलाच फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.

इतर बातम्या
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...