सोसायटीचा डाळिंबाचा विमा अडकला

सोसायटीचा डाळिंबाचा विमा अडकला
सोसायटीचा डाळिंबाचा विमा अडकला

आटपाडी, जि. सांगली ः मृग बहारात धरलेल्या डाळिंब बागांचा थेट रोखीने भरलेला पीकविमा तालुक्‍यात आला आहे. आटपाडी मंडळात हेक्‍टरी ५५ हजार, तर खरसुंडी व दिघंची मंडलात हेक्‍टरी ७१ हजार रुपये विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली. दरम्यान, सोसायटीच्या माध्यमातून कर्जदार खातेदारांना मात्र अजून विमा आलेला नाही. हे शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशी संख्या ५० टक्केहून अधिक आहे. 

आटपाडी तालुक्‍याचे हुकमी फळपीक म्हणून डाळिंबाकडे पाहिले जाते. आटपाडी, दिघंची व खरसुंडी मंडलात बहुतांश शेतकरी मृग बहारात जून, जुलैमध्ये डाळिंबांचा बहार धरतात. ही संख्या मोठी आहे. अनेकांनी डाळिंबाचा पीकविमा जुलैअखेर भरला. दुष्काळ आहे. अवेळी पाऊस, तेल्याने नुकसान झाले. सध्याचा विमा हवामानावर आधारित आहे. हवामानातील बदलाचा डाळिंब पिकावर प्रतिकूल परिणाम होऊन नुकसान झाले. तपासणी, पाहणी करून कंपनीने शेतकऱ्यांना विमा मंजूर केला. सर्वांत कमी आटपाडी मंडलात हेक्‍टरी ५५ हजार तर खरसुंडी व दिघंची मंडलसाठी हेक्‍टरी ७१ हजार रुपये मंजूर करून ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. ज्यांनी थेट रोखीने पैसे भरले त्यांचा मंजूर झालेला विमा आला आहे. अजून ५० टक्के शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यांनी सोसायटीच्या माध्यमातून पीकविमा भरला होता त्यांची यादी आलेली नाही. त्यांची संख्या ५० टक्के आहे. राहिलेला विमा द्यावा, अशी मागणी आहे. 

डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा झाल्याचे संदेश सोमवारी मोबाईलवर आले. दुसऱ्याच दिवशी पैसे काढल्याचेही मेसेज आले. त्यामुळे शेतकऱ्यांचा गोंधळ उडाला.

सोसायटीच्या माध्यमातून डाळिंब विमा भरला आहे. पहिल्या यादीत समावेश केलेला नाही. विमा कंपनीने चार दिवसांत विमा रक्कम खात्यावर जमा करावी. - गणेश गायकवाड, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com