agriculture news in marathi, soil health card panel on agri inputs shop, gondiya, maharashtra | Agrowon

गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार जमीन आरोग्यदर्शक फलक
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

अनावश्‍यक खत मात्रा दिली जाते. यामुळे शेतकऱ्यांचा पैसा नाहक खर्च होतो. हे थांबविण्यासाठी कृषी सेवा केंद्रधारकांना जमीन आरोग्यपत्रिका दर्शनीय भागात लावण्याचे आदेश दिले आहेत.
- भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया

गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा देत त्या माध्यमातून शेतकऱ्यांची उत्पादकता खर्चात बचत व्हावी, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक कृषी सेवा केंद्रधारकांना दुकानात आपल्या भागातील जमिनीचे आरोग्य दर्शविणारे फलक (सॉइल हेल्थ कार्ड) लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जमिनीची आरोग्यपत्रिका योजना राबविली होती. परंतु त्यातील विश्‍लेषणाच्या आधारे शेतकऱ्यांनी अपवाद वगळता खताची मात्रा दिल्याचे उदाहरण नाही. याची दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी थेट कृषी सेवा केंद्रधारकांनाच दुकानाच्या दर्शनीय भागात त्या भागातील जमिनीचे आरोग्य दर्शविणारे फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. २.५ बाय ४ फूट आकाराचे हे फलक असणार आहेत.

त्या भागातील जमिनीत असलेल्या पूरक घटकांची माहिती त्यावर नोंदविलेली असेल. कृषी सेवा केंद्र संचालक त्याआधारे खत खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना माहिती सांगून आवश्‍यक त्याच खतांची विक्री करणार आहेत. या माध्यमातून खतांवरील अनावश्‍यक खर्च वाचणार असून, जमिनीलादेखील गरजेनुरूपच अन्नद्रव्याची मात्रा मिळण्याचा उद्देश साध्य होणार आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...