agriculture news in marathi, Soil health card will joined with aadhar card | Agrowon

जमीन आरोग्यपत्रिकांसाठी एप्रिलपासून 'आधार'सक्ती
मनोज कापडे 
रविवार, 21 जानेवारी 2018

पुणे ः महाराष्ट्रात सुरू असलेल्या जमीन आरोग्यपत्रिकांवर शेतकऱ्यांचे आधार नंबर नमूद केलेच पाहिजेत, अशी सक्ती केंद्र सरकारने केली आहे. त्यामुळे एप्रिलपासून माती तपासणीसाठी नमुने देताना आधार नंबरदेखील घेण्याचा निर्णय कृषी खात्याने घेतला आहे. 

पुणे ः महाराष्ट्रात सुरू असलेल्या जमीन आरोग्यपत्रिकांवर शेतकऱ्यांचे आधार नंबर नमूद केलेच पाहिजेत, अशी सक्ती केंद्र सरकारने केली आहे. त्यामुळे एप्रिलपासून माती तपासणीसाठी नमुने देताना आधार नंबरदेखील घेण्याचा निर्णय कृषी खात्याने घेतला आहे. 

मातीचा नमुना घेताना आधार नंबरसहीत शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आणि अक्षांश-रेखांशदेखील घेण्याची सक्ती केली जात आहे. यात बनावट आरोग्यपत्रिका तयार होण्यास वाव न ठेवण्याची भूमिका केंद्र शासन घेत आहे. या अटींमुळे मात्र कर्मचाऱ्यांच्या झोपा उडाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ''आधार क्रमांक नमूद करण्याबाबत केंद्र शासनाने कडक भूमिका घेतली आहे. २०१८-१९ साठी आरोग्यपत्रिकांचे 

वाटप करताना आधार नंबर टाळता येणार नाही, अशी तंबी केंद्राने दिली आहे. त्यामुळे राज्यातील ६५ लाख शेतकऱ्यांचे आधार क्रमांक कसे गोळा करायचा या प्रश्न उभा राहिला, अशी माहिती माती तपासणी प्रयोगशाळांच्या सूत्रांनी दिली. देशातील प्रत्येक शेतकऱ्याला शेतजमिनीची आरोग्यपत्रिका देण्यासाठी "राष्ट्रीय मृदा आरोग्य पत्रिका अभियान" केंद्राने २०१५ पासून सुरू केले आहे. या योजनेसाठी केंद्राकडून अब्जावधी रुपयांचा निधी दिला जात आहे. त्यामुळेच योजनेच्या प्रगतीविषयी केंद्रातील अधिकारी सातत्याने विचारणा करीत असल्याचे दिसून येते. 

" केंद्राकडून गेल्या वर्षीच ‘आधार नंबर’ घेण्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र, लक्षावधी आरोग्यपत्रिकांचे वाटप झाल्यामुळे पुन्हा आधार नंबर गोळा करता येणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका राज्य शासनाने घेतली होती. त्यामुळे गेल्या वर्षी आधारच्या नियमातून शेतजमीन आरोग्यपत्रिकांची सुटका झाली. मात्र, आता एप्रिल २०१८ पासून मार्च २०१९ या दरम्यान आधार नंबरविना आरोग्यपत्रिका वाटण्यास केंद्र शासनाने स्पष्ट नकार दिला आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

केंद्र शासनाच्या पाठपुराव्यामुळे सध्या माती तपासणीसाठी कृषी खात्याच्या ३१ आणि १३७ खासगी प्रयोगशाळांमध्ये जमीन आरोग्यपत्रिका तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. चालू वर्षात किमान १८ लाख आरोग्यपत्रिकांचे वाटप होण्याची शक्यता आहे. मात्र, या आरोग्यपत्रिका आधारनंबरविना असतील. नव्या आरोग्यपत्रिकांमध्ये मात्र आधार क्रमांक भरण्याची तयारी प्रयोगशाळांनी सुरू केली आहे. 

कृषी खात्यातील बहुतेक कर्मचारी मात्र शेतकऱ्याचा आधार नंबर, मोबाईल नंबर आणि अक्षांश-रेखांश गोळा करण्याच्या अटीमुळे हैराण झाले आहेत. गावपातळीवरील समस्या विचारात न घेता या अटी लावल्याचे कर्मचारी सांगत आहेत. "गावांमध्ये मोबाईलला रेंज नसते. तसेच आधार नंबर देण्यासाठी शेतकरी सापडत नाहीत. सापडलेले शेतकरी नंबर देण्यास तयार नसतात. त्यामुळे या अटी कुचकामी आहेत, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 

त्रोटक माहिती असल्यास नमुने न स्वीकारण्याच्या सूचना
जमीन आरोग्यपत्रिकांचे वाटप करताना शेतकऱ्यांकडील त्रोटक माहितीचे मातीचे नमुने तपासणीसाठी स्वीकारू नका, अशा सूचना प्रयोगशाळांना देण्यात आलेल्या आहेत. आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, अक्षांश रेखांश, गटातील सहा प्रमुख पिके, या पिकांचे वाण, गावाचा बागायती-कोरडवाहू चिन्हांकित नकाशा, नमुना चिठ्ठी अशी तपशीलवार माहिती देण्याचे बंधन आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

इतर अॅग्रो विशेष
पारंपरिक उत्साहात शिवजयंती साजरीपुणे : संपूर्ण महाराष्ट्रासह देश-विदेशात अनेक...
माजी आमदार जयंत ससाणे यांचे निधन नगर  :  कॉंगेसचे जिल्हाध्यक्ष माजी...
मराठवाड्याच्या तहानेवर इस्रायली उपाय!७००-८०० मि.मी पाऊस पडणाऱ्या मराठवाड्यात...
जगणे सुसह्य करण्यासाठी जागे व्हाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शेती,...
‘महामेष’ योजना ३४ जिल्ह्यांत राबविणार...औरंगाबाद : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना...
शेतीतील यांत्रिकीकरणासाठी हवे शासनाचे...अकोला ः अाजच्या बदलत्या काळात शेती पद्धतीत...
मध्य प्रदेशात गारपीटग्रस्तांना हेक्टरी...नवी दिल्ली ः मध्य प्रदेश राज्यात नुकत्याच...
गारपीटग्रस्तांना भरीव मदतीचा प्रस्ताव...नागपूर ः गारपीटग्रस्तांना सरकारकडून जाहीर करण्यात...
शेतकरी कंपन्यांच्या धान्य खरेदीबाबत...पुणे : हमीभावाने धान्य खरेदीत शेतकरी उत्पादक...
महसूल मंडळातील सरासरी उत्पादकतेनुसार...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
गारपीटग्रस्त क्षेत्र तीन लाख हेक्टरमुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या...
राजधानी दिल्लीत शेती क्षेत्रावर आज...नवी दिल्ली : देशाला नवे कृषी धोरण देण्यासाठी...
‘कापूस ते कापड’पासून आता ‘पिकणे ते...नाशिक : राज्यातील कापसावर प्रक्रिया होऊन...
उन्हाचा चटका जाणवू लागलापुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी होऊ...
बचत, व्यवसायातून मिळवली आर्थिक सक्षमता गोऱ्हे बु. (ता. हवेली, जि. पुणे) गावामधील...
एकट्या मराठवाड्यातच २ लाख हेक्टरचे...औरंगाबाद : मराठवाड्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान...
विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः अजित...नगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा, महागाईचा...
राज्यातील पाच हजार सोसायट्यांचे...खामगाव, जि. बुलडाणा : राज्यात आगामी काळात ५०००...
पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणारपुणे : राज्यावरील ढगाळ हवामानाचे सावट दूर...
विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः पवारनगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा,...