देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्य

महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्येजमिनीच्या आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. या भागातील जमिनीचा पोत सातत्याने खालावत असून सेंद्रिय कर्बाचे प्रमाणही घटत आहे. एकात्मीक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अंगीकार त्याकरिता करावा लागेल. - डॉ. एस. के. सिंह, संचालक, राष्ट्रीय मृदा सर्व्हेक्षण व जमीन उपयोग संस्था, नागपूर
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्य
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्य

नागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला बगत, पाण्याचा अतिरेकी वापर या कारणांमुळे देशासह महाराष्ट्रातील जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत असल्याचे निरीक्षण राष्ट्रीय मृदा सर्व्हेक्षण आणि जमीन उपयोग संस्थेने नोंदविले आहे. महाराष्ट्राच्या मालेगाव, नगर, धुळे, जळगाव, पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असून, या भागात वेळीच उपायांची गरज व्यक्‍त करण्यात आली आहे.  सेंद्रिय कर्ब कमी असलेल्या प्रदेशांमध्ये पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगालमधील समुद्र किनाऱ्यालगतचा भाग, कर्नाटक, तेलंगणा, आंध प्रदेश मधील गुंटूंर, नेल्लोर, कृष्णा, चित्तुर, तिरुपती हे जिल्हे, गुजरातमधील सुरत, बडोदरा, वलसाड यांचा समावेश आहे. गुजरातमधील याच जिल्ह्यात कापसाखालील क्षेत्र असून तेथील उत्पादकता महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक आहे. सातपुडा पर्वतरांगानजीक असल्याने त्याचा फायदा वलसाडमधील काही भागांना सेंद्रिय कर्ब टिकविण्यासाठी झाला आहे. पंजाब, हरियाणा राज्यातदेखील जमिनीचा पोत खालावत असताना कापूस आणि गव्हाचे उत्पादकता अधिक असण्यामागे पाणी हे मुख्य कारण असल्याचे निरीक्षण आहे. अमृतसर, जालंधर, लुधीयाना या भागातील जमिनीत पूर्वी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अपेक्षित होते. परंतु, खोल मशागतीमुळे जमीन उघडी पडत सूर्यप्रकाशाने येथील जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा ऱ्हास झाला. आज या भागातील सेंद्रिय कर्बाने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे.  विदर्भात चार जिल्ह्यांत सेंद्रिय कर्ब चांगला देशात सुपिकतेच्या बाबतीत विदर्भातील जमिनीची आघाडी आहे. येथील जमिनीत २५ ते ३० टन प्रती हेक्‍टर इतक्‍या मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्बाची उपलब्धता आहे. मात्र, यात अकोला, अमरावती, वर्धा, नागपूरसह मराठवाड्यातील लातूर अशा काही मोजक्‍याच जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश होतो. अमरावती जिल्ह्यांत सातपुडा पर्वतरांगा आहेत. त्यामुळे या भागात आर्दता टिकून राहते. त्याचा संत्र्यासारख्या पिकाला फायदा होतो. परिणामी या भागात संत्रा चांगला येत असल्याचे निरीक्षण आहे. 

राज्यातील या जिल्ह्यात धोक्‍याची घंटा खोल मशागत, सातत्याने उसासारखे एकच पीक आणि त्याकरिता पाण्याचा अतिरेकी वापर तसेच एकात्मीक खत व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष या कारणांमुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील जमिनीचा पोत सातत्याने खालावत आहे. २० ते २५ टन प्रती हेक्‍टर इतके सेंद्रिय कर्बाचे  प्रमाण या भागातील काही जिल्ह्यातील जमिनीमध्ये उरले आहे. पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनीची धूप होत असल्याने हा धोका निर्माण झाला आहे. मालेगाव, नगर, धुळे, जळगाव, पुणे, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे. एकात्मीक खत व्यवस्थापन पद्धती नसल्याने पिकात येणाऱ्या स्टार्चची उपलब्धता जमिनीद्वारे भागविली जाते. या भागातील जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होण्यामागे नोंदविण्यात आलेल्या कारणात याचादेखील समावेश आहे.  सर्वाधिक सेंद्रिय असलेला संपन्न प्रदेश देशात जम्मू काश्‍मीर, हिमाचल, उत्तराखंड, सिक्‍कीम, मेघालय, नागालॅंड, अरुणाचल प्रदेश, त्रिपूरा या भागात ३५ ते ८० टन प्रती हेक्‍टर अशा सर्वाधिक सेंद्रिय कर्बाची उपलब्धता आहे. त्यामागे या भागातील थंड वातावरण, कमी मशागतीची पीक अशी अनेक कारण असल्याचे सांगण्यात आले.  राजस्थानमध्ये विकृतीत वाढ राजस्थानच्या जैसलमेर, बाढमेर हे जिल्हे वाळूप्रवण आहेत. त्यामुळे या भागातील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण शून्य ते दहा टन प्रती हेक्‍टर असे आहे. या जमिनीत मिरची चांगली होते, त्यामुळे लागवड क्षेत्र अधिक आहे. जैसलमेर, बिकानेर हे त्यामुळेच मिरचीकरिता ओळखले जातात तर उदयपूर, भिलवाडा, कोटा या जिल्ह्यात मका लागवड आहे. राजस्थानप्रमाणेच जमिनीचा पोत पाहून पिकाच्या लागवडीवर भर दिला गेला तर उत्पादकता अधिक मिळते, असेही निरीक्षण आहे.  झारखंडमध्ये आम्लयुक्‍त जमीन झारखंड राज्यातील गुमला भागात धान (भात) घेतला जातो. परंतु, आम्लयुक्‍त जमीन असल्याने अनेक धोकेही या भागात आहेत. या भागातील नागरिकांमध्ये आजारपण बळावते, असे निरीक्षण आहे. 

मध्य प्रदेशातील काही जिल्हे सुपीक रेवा, शिवपूरी, ग्वॉलियर या भागातील जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी होत आहे. याउलट इंदूर, भोपाळ, झांशी, उज्जेन, देवास, जबलपूर हा सुपीक प्रदेश आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com