agriculture news in marathi, Soil testing is important to check the health of the soil | Agrowon

जमिनीचे आरोग्य तपासण्यासाठी माती परीक्षण महत्त्वाचे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 डिसेंबर 2017

सोलापूर : ‘‘माती ही मातीमोल नसून ती जगाला पोसणारी काळी आई आहे. तिचे आरोग्य जपा, तिला समजून घ्या आणि हे करायचे असेल, तर माती परीक्षण ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी जमिनीचे आरोग्य समजून घेणे महत्त्वाचे आहे,’’ असे प्रतिपादन सोलापुरातील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. विजय अमृतसागर यांनी केले.

सोलापूर : ‘‘माती ही मातीमोल नसून ती जगाला पोसणारी काळी आई आहे. तिचे आरोग्य जपा, तिला समजून घ्या आणि हे करायचे असेल, तर माती परीक्षण ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी जमिनीचे आरोग्य समजून घेणे महत्त्वाचे आहे,’’ असे प्रतिपादन सोलापुरातील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. विजय अमृतसागर यांनी केले.

मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्रात जागतिक मृदा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. अमृतसागर बोलत होते. कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे, कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी प्रा. डी. डी. कदम, तालुका कृषी अधिकारी बी. डी. सरडे, डॉ. बी. एस. कदम उपस्थित होते.

डॉ. अमृतसागर म्हणाले, ‘‘दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता आणि आरोग्य बिघडत आहे, त्यातच वाढत चाललेल्या रासायनिक खतांचा बेसुमार वापर यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्‍यात आहे. त्यामुळेच यापुढील काळात सेंद्रिय खताचा वापर मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे. एकदमच सेंद्रियवर जाण्याऐवजी रासायनिक आणि सेंद्रिय असा मध्य साधावा.’’

प्रारंभी उपस्थित शेतकऱ्यांना माती नमुना कसा घ्यावा, याबद्दलचे प्रात्यक्षिक काजल जाधव यांनी दाखविले. कृषी विज्ञान केंद्र परिसरामध्ये गहू, ज्वारी, मका, हरभरा, बाजरी करडई, लसून घास, बरसीम घास, ओट घास अशा प्रकारच्या विविध पिकांचे पीक संग्रहालय व विविध वाण याबद्दलची माहिती डॉ. तानाजी वळकुंडे यांनी शेतकऱ्यांना दिली. तालुका कृषी अधिकारी सरडे यांनी कृषी विभागातील विविध योजनांबद्दलची माहिती व त्यातील शंकेचे निरसन केले.

इतर ताज्या घडामोडी
जात पडताळणीसाठी रक्त नात्यातील दाखला...नागपूर : रक्त नात्यातील व्यक्तीची जात पडताळणी...
कोंबडीखताचा वापर कसा करावा?मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर...
ऊस पाचटाचे गांडूळ खत कसे तयार करावे?गांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, बाजरी, मका... कापूस बीटी कापूस बोंड अळ्यांना प्रतिकारक्षम...
मका, सोयाबीन, हळदीच्या भावात घसरणएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व सोयाबीन वगळता...
अभिनव पद्धतीने सणसरला आंदोलनभवानीनगर, जि. पुणे   ः सणसर येथील कुरवली...
मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध :...नागपूर : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत...
पुणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाची...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या दहा...
खारपाणपट्ट्यात भूसुधारणा कार्यक्रम...अकोला  : जिल्ह्यात खारपाणपट्ट्याचे प्रमाण...
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....