agriculture news in marathi, The soil, water management is foundation of grape production | Agrowon

माती,पाणी व्यवस्थापन द्राक्ष उत्पादनाचा पाया
टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

द्राक्ष शेतीसमोरील आव्हाने वाढत आहेत. वाढता खर्च हे सर्वांत मोठे आव्हान आहे. द्राक्ष उत्पादकांनी खते, कीडनाशके आणि सल्ला यावरील अनावश्यक खर्च टाळावा.
- अशोक गायकवाड, माजी अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे.

नाशिक  :  माती, पाणी व्यवस्थापन हा दर्जेदार द्राक्ष उत्पादनाचा पाया आहे. त्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. असा सूर ''द्राक्ष मंथन'' परिषदेत उमटला.

‘ॲग्रोकेअर कृषी मंच`तर्फे शुक्रवारी (ता. २८) ओझर येथील सिद्धिविनायक लॉन्स येथे ''द्राक्ष मंथन २०१८'' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बी. व्ही. जी. ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांच्या हस्ते परिषदेचे उद्‍घाटन करण्यात आले. राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड अध्यक्षस्थानी होते. या वेळी कृषी मंचचे अध्यक्ष भूषण निकम, कृषी उद्योजक एस. बी. काशीद, द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक माणिकराव पाटील, अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघाचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे आदी उपस्थित होते.

अ. दाभोळकर प्रयोग परिवाराचे समन्वयक वासुदेव काठे, सेंद्रिय शेती तज्ज्ञ डॉ. प्रशांत नाईकवाडी, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक अरुण मोरे, प्रयोगशील द्राक्ष उत्पादक अनंत मोरे, अरविंद भालेराव, अरविंद खोडे, हेमंत ब्रह्मेचा, मनोज जाधव यांनी परिषदेत मार्गदर्शन केले.

जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. माती, पाणी तपासणी करणे ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. शेतीकडे विद्यापीठ म्हणून पाहिले पाहिजे, असे वक्त्यांनी सांगितले. डॉ. वसंत ढिकले यांनी सूत्रसंचालन केले. भूषण निकम यांनी आभार मानले.

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
फळबागेत पाणी साठवण कुंड कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे...
फणस लागवड  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते....
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
उष्ण, कोरडे हवामान मॉन्सून वाटचालीस...महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागावर १००८ हेप्टापास्कल...
भंगाराम तळोधी येथे राइसमिलवर कारवाईचंद्रपूर ः कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिक जिल्ह्यातील ५४३ गावांची...नाशिक ः गावठाण निश्‍चितीसाठी गावांमध्ये ग्रामसभा...
नाशिक : टँकरने पाणीपुरवठ्यासाठी जीपीएस...नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक जाणवू...
अनुदानाअभावी चारा छावण्या संकटातबिजवडी, जि. सातारा : माण तालुक्‍यामध्ये १९७२...