agriculture news in marathi, in Solapur 44 thousand farmers got debt waiver | Agrowon

सोलापुरात ४४ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 डिसेंबर 2017

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पात्र ४४ हजार ७६६ शेतकऱ्यांना २२७ कोटी ६१ लाख १४, ५५३ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पात्र ४४ हजार ७६६ शेतकऱ्यांना २२७ कोटी ६१ लाख १४, ५५३ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

शेतकरी कर्जमाफी अंतर्गत २१,७५८ शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच १२,८८२ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. त्यापोटी २३ कोटी ७० लाख २५,२१३ रुपये वितरित करण्यात आले आहेत, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी ही माहिती दिली.
श्री. देशमुख म्हणाले, "या योजनेतून १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च  २०१६ या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे कर्ज ३० जून २०१६ अखेर थकीत व ३१ जुलै २०१७ पर्यंत परतफेड न केलेल्या थकीत कर्जावर रुपये दीड लाखापर्यंत माफ होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे दीड लाखापेक्षा जास्त कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांसाठी एक रकमी परतफेड योजना लागू केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी दीड लाखावरील रक्कम भरणा केल्यास त्यांचे कर्ज खात्यावर शासनाकडून दीड लाखपर्यंत रक्कम भरणा केली जाणार आहे. तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना लागू आहे. तर  २०१५-१६ मध्ये कर्ज घेऊन त्याची परतफेड ३० जून २०१७ पर्यंत केली आणि २०१६-१७ मध्ये कर्ज घेतले असल्यास त्याची परतफेड ३१ जुलै २०१७ पर्यंत केली असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर योजनेमध्ये त्यांनी परतफेड केलेल्या कर्जाच्या २५ टक्के पण किमान १५ हजार व जास्तीत जास्त रुपये २५ हजार एवढी रक्कम या शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर शासनातर्फे जमा केली जाणार आहे.''''
"जिल्ह्यातील १४ हजार ५७२ शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानास पात्र ठरले आहेत. त्यापैकी १२ हजार ८८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर २३ कोटी ७० लाख २५२१३ रुपये जमा करण्यात आले आहेत. २१ हजार ७५८ शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजनेचा लाभ मिळणार आहे. त्या शेतकऱ्यांनी संबंधित बॅंकेस संपर्क साधावा, या वन टाइम सेटलमेंटची मुदत ३१ मार्च २०१८ पर्यंत आहे. अशा शेतकऱ्यांनी दीड लाख रुपयांवरील कर्जाची रक्कम भरल्यास त्यांना कर्जमाफी मिळणार आहे, असे जिल्हा निबंधक अविनाश देशमुख यांनी सांगितले.

 

एक दृष्टिक्षेप

- जिल्ह्यात ४४ हजार ७६६ शेतकऱ्यांना फायदा
- २२७ कोटी ६१ लाख १४,५५३ रुपयांची माफी
- जिल्ह्यातील १२ हजार ८८२ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान
- त्यापोटी २३ कोटी ७० लाख २५२१३ रुपये वितरीत
- २१७५८ शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट योजनेचा लाभ मिळणार

इतर ताज्या घडामोडी
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...
मिरज पूर्व भागात पाण्यासाठी भटकंती सुरूच सांगली : म्हैसाळ योजनेचा उपसा सुरू होऊन महिना...
धुळ्यात हरभरा खरेदी केंद्रांची संख्या... धुळे  ः धुळे जिल्ह्यातही हरभरा व तुरीला...
येवल्यातून यंदा २८७३ टन द्राक्ष निर्यात येवला, जि. नाशिक : उन्हाळा आला की ५० वर गावांची...
फळबाग लागवडीकडे नाशिकमधील शेतकऱ्यांची... नाशिक : अस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेल्या...
अकोला जिल्ह्यातील कृषी विभागात १०६ पदे...अकोला : जिल्ह्यात कृषी विभागात शंभरावर विविध पदे...
यंदा पीक आणि पाऊस साधारण : भेंडवळच्या...भेंडवळ जि. बुलडाणा : या हंगामात पीक आणि पाऊस...
मराठवाड्यासाठी २० सौरऊर्जा प्रकल्पांना... लातूर ः मराठवाड्यातील विजेची गरज लक्षात घेऊन...
तयारी हळद लागवडीची...हळद लागवडीसाठी चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची...
सांगली जिल्ह्यात खंडित वीजपुरवठ्याने... सांगली  : कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी...