agriculture news in marathi, solapur APMC 39 crore fraud case opens | Agrowon

सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा गैरव्यवहार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 मे 2018

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत २०११ ते २०१६ या कालावधीत ३९ कोटी सहा लाख ३९ हजार १९३ हजारांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन सभापती, माजी आमदार दिलीप माने, इंदुमती अलगोंडा यांच्यासह ३७ जणांवर विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे यांनी सोमवारी (ता.२१) जेलरोड पोलिसांत तक्रारी अर्ज दिला होता. पोलिसांनी कागदपत्रांची पडताळणी करून अखेरीस मंगळवारी (ता.२२) रात्री उशिरा ३७ जणांवर गुन्हा दाखल केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत २०११ ते २०१६ या कालावधीत ३९ कोटी सहा लाख ३९ हजार १९३ हजारांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन सभापती, माजी आमदार दिलीप माने, इंदुमती अलगोंडा यांच्यासह ३७ जणांवर विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे यांनी सोमवारी (ता.२१) जेलरोड पोलिसांत तक्रारी अर्ज दिला होता. पोलिसांनी कागदपत्रांची पडताळणी करून अखेरीस मंगळवारी (ता.२२) रात्री उशिरा ३७ जणांवर गुन्हा दाखल केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

बाजार समितीत १ एप्रिल २०११ ते १७ ऑक्‍टोबर २०११ या कालावधीत १४ समिती सदस्य, एक सचिव आणि १८ ऑक्‍टोबर २०११ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत २० समिती सदस्य आणि दोन सचिव यांनी गैरव्यवहार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

याबाबत माहिती अशी, की बाजार समितीच्या रकमा मुदत ठेव म्हणून ठेवताना बाजार समितीला फायदा होईल अशा प्रकारे गुंतवणूक केल्या नाहीत, बाजार समितीमधील बांधकाम मुदतीमध्ये न करणाऱ्या ठेकेदाराला दंड केला नाही, सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी बाजार समितीमध्ये शिपाई, लिपिक व अन्य कर्मचारी नियुक्त करता येत नसतानाही नियुक्ती  केली, यासह १४ मुद्‌द्‌यांचा काकडे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

प्रामुख्याने १ जानेवारी २०११ ते १७ ऑक्‍टोबर २०११ या कालावधीतील गैरव्यवहारप्रकरणी सभापती इंदुमती अलगोंडा, उपसभापती बाळासाहेब शिंदे, सदस्य महादेव चाकोते, दिलीप माने, नागराज पाटील, शंकर येनगुरे, ऊर्मिला शिंदे, अविनाश मार्तंडे, रजाक निंबाळे, धोंडिराम गायकवाड, महादेव पाटील, अप्पासाहेब उंबरजे, प्रभाकर विभुते, दगडू जाधव, सचिव डी. व्ही. कमलापुरे हे संशयित आरोपी आहेत. १८ ऑक्‍टोबर २०११ ते १७ ऑक्‍टोबर २०१६ या कालावधीतील गैरव्यवहारप्रकरणी सभापती दिलीप माने, उपसभापती राजशेखर शिवदारे, सदस्य केदार विभुते, राजेंद्र गुंड, प्रवीण देशपांडे, सिद्धाराम चाकोते, सोजन पाटील, इंदुमती अलगोंडा, शांताबाई होनमुर्गीकर, उत्तरेश्‍वर भुट्टे, बाळासाहेब शेळके, अशोक देवकते, अविनाश मार्तंडे, पिरप्पा म्हेत्रे, श्रीशैल गायकवाड, चंद्रकांत खुपसंगे, नसीरअहमद खलिफा, बसवराज दुलंगे, हकीम महदम शेख, सिद्रामप्पा यारगले, सचिव डी. व्ही. कमलापुरे, प्रभारी सचिव यू. आर. दळवी हे संशयित आरोपी आहेत. 

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकारण रंगले 
सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया येत्या दोन-तीन दिवसात जाहीर होणार आहे. पण त्याचपूर्वी तत्कालीन सभापतींसह संचालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या या प्रकारामुळे चांगलेच राजकारण रंगल्याचे चिन्ह आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातील ही बाजार समिती असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. दीडवर्षापूर्वी बाजार समितीच्या संचालकमंडळाची मुदत संपल्यानंतर निवडणूकीऐवजी बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आला आहे. आतापर्यंत दोनवेळा या प्रशासनकाला मुदतवाढ देण्यात आली. शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार, या कारणामुळे ही निवडणूक पुढे ढकलली. पण एकीकडे ही प्रक्रिया सुरु असताना, दुसरीकडे बाजार समितीतील गैरव्यवहाराबाबत पडताळणीचे काम सुरु होते. तत्कालीन सभापती, माजी आमदार दिलीप माने आणि मंत्री देशमुख हे परंपरागत विरोधक आहेत. निवडणुकीच्या तोंडावरच ही कारवाई सुरु झाल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. येत्या काळात ते आणखी रंगण्याची चिन्हे आहेत. 

आमचा कार्यकाळ संपून आता दीड वर्ष झाले आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी केलेले हे राजकीय कारस्थान आहे. याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागू.  
- दिलीप माने, तत्कालीन माजी सभापती, माजी आमदार

इतर ताज्या घडामोडी
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...
येवला तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी वणवणनाशिक : कमी पावसामुळे येवला तालुक्यात पाणीटंचाई...
हवामानविषयक समस्यांमुळे शेतीवर परिणाम ः...परभणी ः जागतिक तापमान वाढ, पावसातील अनियमितता,...
मतदार यादीत वाढला महिलांचा टक्कानगर : निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी जिल्हा...
तापमानातील चढ-उताराचा अंजीर उत्पादकांना...परभणी : तापमानातील चढ-उतारामुळे अंजिराची फळे...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; दर वाढलेपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
यंदा मतदानात महिला पुरुषांना मागे टाकणारनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये पुरुषांपेक्षा...
शक्तिशाली उल्कापातापासून बचावली पृथ्वीपुणे ः अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’...
संत्रा बागांना उरला केवळ टॅंकरचा आधारअमरावती : संत्रा बागा जगविण्यासाठी...
मराठवाड्याच्या पाण्यासाठी फक्त बोलून...परभणी : केवळ जायकवाडीच्या हक्काच्या...
राज्यात चार हजाराने मतदान केंद्रे वाढलीमुंबई  : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात...
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीचा...मुंबई : गेले सहा महिने विविध समविचारी पक्षांशी...
चंद्रपूर : बांगडेंच्या उमेदवारीने...चंद्रपूर : गेल्या पंधरवाड्यापासून चंद्रपूर...
प्रियांका गांधींचा नागपुरात होणार रोड शोनागपूर ः काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ...
अमरावती लोकसभेसाठी होईल दुहेरी लढतअमरावती : शिवसेनेकडून दोनदा संसदेत गेलेल्या...
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...