agriculture news in marathi, solapur APMC elections voter list objections till 25th april | Agrowon

सोलापूर बाजार समिती : प्रारूप मतदार यादीवर २५ पर्यंत हरकती
टीम अॅग्रोवन
रविवार, 15 एप्रिल 2018

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने सुधारित प्रारूप यादी जाहीर करण्यात आली. एक लाख १८ हजार ८३० मतदारांचा समावेश असलेल्या या यादीवर दावे व हरकती स्वीकारण्यास सुरवात झाली आहे. येत्या २५ एप्रिलपर्यंत यासंबंधीच्या हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. 

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने सुधारित प्रारूप यादी जाहीर करण्यात आली. एक लाख १८ हजार ८३० मतदारांचा समावेश असलेल्या या यादीवर दावे व हरकती स्वीकारण्यास सुरवात झाली आहे. येत्या २५ एप्रिलपर्यंत यासंबंधीच्या हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. 

दाखल झालेल्या हरकतींवर २६ एप्रिल ते ७ मे या कालावधीत निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर १४ मे रोजी सोलापूर बाजार समितीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यासाठी ३१ डिसेंबर २०१७ ही अर्हता तारीख निश्‍चित करण्यात आली आहे. बाजार समितीसाठी पूर्वी सामाईक सातबारा उताऱ्यावर एकाच शेतकऱ्याला मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या वतीने या निकषात बदल केला. 

सामाईक सातबारावरील सर्व व्यक्तींच्या नावे किमान १० गुंठे क्षेत्र असेल, तर सर्वांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार आता सुधारित मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. या सुधारित निकषामुळे पूर्वी सोलापूर बाजार समितीची शेतकरी मतदार संख्या ८२ हजार ३८९ वरून एक लाख १६ हजार ५५६ एवढी झाली आहे. नव्याने तयार झालेल्या मतदार यादीत १ लाख १६ हजार ५५६ शेतकरी मतदार, २ हजार २७४ हमाल, तोलार मतदार यांचा समावेश आहे. 

दरम्यान, बार्शी बाजार समितीच्या बाबतीतही न्यायालयाने आदेश दिला आहे. १५ मेपर्यंत मतदार यादी अंतिम केली जाणार आहे. बार्शी बाजार समितीसाठी शेतकऱ्यांची मतदार यादी तहसील कार्यालयाच्या वतीने बाजार समितीला देण्यात आली आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...