agriculture news in marathi, solapur band has mix response | Agrowon

‘बंद‘ला सोलापुरात संमिश्र प्रतिसाद
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

सोलापूर : इंधनदरवाढ आणि महागाईच्या विरोधात काँग्रेसने पुकारलेल्या बंदला विविध पक्षांसह संघटनांनी पाठिंबा दिला, पण सोलापुरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही प्रमुख बाजारपेठांतील बंद वगळता शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. शिवाय शाळा, महाविद्यालये आणि बॅंकाही सुरू होत्या. या बंदमुळे सोलापूर बाजार समितीतील आवक काहीशी कमी झाली होती, तरीही सगळे व्यवहार सुरळीत सुरू होते. दरम्यान, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने पेट्रोल पंपावर निदर्शने केली; तर जबरदस्तीने बाजारपेठा बंद करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले.

सोलापूर : इंधनदरवाढ आणि महागाईच्या विरोधात काँग्रेसने पुकारलेल्या बंदला विविध पक्षांसह संघटनांनी पाठिंबा दिला, पण सोलापुरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही प्रमुख बाजारपेठांतील बंद वगळता शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. शिवाय शाळा, महाविद्यालये आणि बॅंकाही सुरू होत्या. या बंदमुळे सोलापूर बाजार समितीतील आवक काहीशी कमी झाली होती, तरीही सगळे व्यवहार सुरळीत सुरू होते. दरम्यान, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने पेट्रोल पंपावर निदर्शने केली; तर जबरदस्तीने बाजारपेठा बंद करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले.

शहरातील नवीपेठसह काही प्रमुख बाजारांतील व्यवहार बंद राहिले; पण दुपारनंतर पुन्हा हे सगळे व्यवहार सुरळीत झाले. सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे सात रस्ता येथील कारागीर पेट्रोल पंपासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यात सहभागी झालेल्या माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्यासह ६५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. रेल्वे स्टेशन परिसरात बंदच्या निषेधार्थ रस्त्यावर टायर जाळण्यात आले. नवी पेठ येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बंदचे आवाहन करण्यात येत असताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर मनोहर सपाटे, कार्याध्यक्ष संतोष पवार, काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे आदी त्यांना पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी ताब्यात घेतले.

जिल्ह्यातही बंदचे काहीसे पडसाद उमटले. पंढरपुरातील विविध पक्ष व संघटनांनी सावरकर चौकात ठिय्या आंदोलन केले. या वेळी मार्गावरील वाहतकू खोळंबली होती. मंगळवेढ्यातही काँग्रेसच्या वतीने रास्ता-रोको करण्यात आला.

बाजार समितीचे व्यवहार सुरळीत
सोलापूर बाजार समितीतील व्यवहारही सोमवारी नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होते. आवक काहीशी कमी असली, तरी व्यवहार झाले. विशेषतः भुसार बाजारावर त्याचा काहीसा परिणाम झाला, पण पालेभाज्या, फळभाज्या विभागात लिलाव रोजच्याप्रमाणे पार पडले. बाजार समितीची दिवसाची उलाढाल सुमारे ५० लाखांहून अधिक आहे.

इतर बातम्या
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड...
कृषी क्षेत्रातील उत्पन्नाची तफावत दूर...औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांतील परिवर्तनात...
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारीनाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलिया...पंढरपूर, सोलापूर (प्रतिनिधी) :  आता कोठे...
दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्यंत...पुणे : राज्यात उत्पादित होणाऱ्या (पिशवी बंद...
दुष्काळग्रस्तांना सरसकट हेक्टरी ५० हजार...मुंबई : राज्यात यंदा १९७२ पेक्षाही भयंकर...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...