agriculture news in Marathi, Solapur, Barshi APMC election shedule ready | Agrowon

सोलापूर, बार्शी बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम तयार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 मे 2018

सोलापूर : सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची संपूर्ण तयारी प्रशासनाने केली असून, निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रकही तयार झाले आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी हे वेळापत्रक आता पाठवण्यात आले आहे. त्यांच्या मान्यतेनंतर तातडीने निवडणूक लागण्याची शक्‍यता आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार २५ जून ही निवडणुकीची तारीख निश्‍चित करण्यात आली आहे.

सोलापूर : सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची संपूर्ण तयारी प्रशासनाने केली असून, निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रकही तयार झाले आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी हे वेळापत्रक आता पाठवण्यात आले आहे. त्यांच्या मान्यतेनंतर तातडीने निवडणूक लागण्याची शक्‍यता आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार २५ जून ही निवडणुकीची तारीख निश्‍चित करण्यात आली आहे.

निवडणूक प्रशासनाने दोनच दिवसांपूर्वी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आता निवडणूक कार्यक्रमही तयार झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली निवडणुकीबाबतची उत्सुकता संपणार आहे. निवडणूक शाखेने पाठविलेल्या निवडणूक कार्यक्रमात २३ ते २८ मेदरम्यान उमेदवारांची अर्ज स्वीकृती, २९ मे रोजी छाननी, १२ जून रोजी उमेदवारी मागे घेण्याची मुदत, १३ मे रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप प्रस्तावित करण्यात आले आहे. २५ जूनला मतदान तर २७ जून रोजी मतमोजणी प्रस्तावित करण्यात आली आहे.

बार्शी व सोलापूर बाजार समितीसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर तहसीलदार अथवा सहायक निबंधक दर्जाच्या अधिकाऱ्यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता मिळावी म्हणूनही प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या दोन्ही समित्यांसाठी प्रत्येकी एक निवडणूक निर्णय अधिकारी व दोन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. दरम्यान, बार्शी व सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत ईव्हीएम वापरणार की मतपत्रिका याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, त्याबाबतही निर्णय अपेक्षित आहे.

इतर ताज्या घडामोडी
`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्‍त शिवार अभियानातंर्गत भूजल...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...
सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...
नगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...
सोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...
नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...
सोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...
योग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...
नाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...
बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...
प्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...
ऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...
नामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...
वजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...
कोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...
हमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...