सोलापूर, बार्शी बाजार समिती निवडणुकीसाठी मतदार यादी तयार

सोलापूर, बार्शी बाजार समिती निवडणुकीसाठी मतदार यादी तयार
सोलापूर, बार्शी बाजार समिती निवडणुकीसाठी मतदार यादी तयार

सोलापूर : न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी बार्शी व सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. सोलापूरसाठी १ लाख १८ हजार ८९९, तर बार्शीसाठी १ लाख ६ हजार १७६ एवढे मतदार अंतिम मतदार यादीत घेण्यात आले आहेत.  अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी न्यायालयाने दोन्ही बाजार समितीच्या बाबतीत १५ मे ही अंतिम मुदत दिली होती. प्रशासनाने त्यानुसार या मुदतीच्या एक दिवस अगोदरच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे.  सोलापूर बाजार समितीचे गणनिहाय अंतिम मतदार याप्रमाणे : कळमण : ५९५४, नान्नज : ५९३०, पाकणी : ५२५८, मार्डी : ५५३१, बोरामणी : १०४४०, बाळे : ६४२५, हिरज : ६६५०, कुंभारी : ८७७६, मुस्ती : ८८३६, होटगी : ९९३९, कणबस : ६७५८, मंद्रूप : ९०७६, कंदलगाव : ८३९,  भंडारकवठे : ८४३९, औराद : ८७७४, व्यापारी : ११६९, हमाल व तोलार : ११०५.  बार्शी बाजार समितीचे गणनिहाय अंतिम मतदार याप्रमाणे : आगळगाव : ६६३७, पांगरी : ७८२१, कक्कडगाव : ६२०२, जामगाव : ७९२०, उपळाई (ठों.) : ७८१९, मळेगाव : ६७२९, कारी : ६८४७, घाणेगाव : ७४९८, उपळे (दु.) : ६६८७, पानगाव : ७५७१, श्रीपत पिंपरी : ६४८७, सुर्डी :६५२३, सासुरे : ६७४६ , शेळगाव (आर.) : ६७४०, भालगाव : ६२५०, व्यापारी : ८९१, हमाल व तोलार : ८०८.  या दोन्ही बाजार समित्यांसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर आता प्रत्यक्ष निवडणूक वेळापत्रकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक शाखेने अंतिम केलेली मतदार यादी मान्यतेसाठी सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविण्यात आली आहे. प्राधिकरणाची मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यक्रम जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com