विठ्ठल खत कारखान्याच्या कर्जवसुलीसाठी जिल्हा बॅंक सरसावली

विठ्ठल खत कारखान्याच्या कर्जवसुलीसाठी जिल्हा बॅंक सरसावली

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून कर्ज घेतलेल्या पंढरपूर तालुक्‍यातील विठ्ठल खत उत्पादक संस्थेने बॅंकेच्या कर्जाची व व्याजाची परतफेड केली नाही. या कर्जदाराच्या विरोधात बॅंकेने सहकार न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने बॅंकेच्या बाजूने निकाल दिला. आता साडेसोळा टक्के व्याजदराने खत कारखान्याच्या संचालकांकडून ही रक्कम वसूल केली जाणार आहे. या रकमेच्या वसुलीसाठी संचालकांच्या मालमत्तेवर बोजा चढवावा आणि वसुली करावी, असा निर्णय जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमध्ये अध्यक्ष राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेतला. जिल्हा बॅंकेच्या वतीने या कारखान्याला २००१ मध्ये कर्ज दिले होते. खत कारखाना सुरू असतानाही कारखाना परतफेड करत नसल्याने कारखान्याच्या विरोधात बॅंकेने २०१४ मध्ये एक कोटी ५८ हजार रुपयांचा दावा सहकार न्यायालयात दाखल केला होता. १ जानेवारी २०१४ पासून ते पैसे भरेपर्यंत साडेसोळा टक्के व्याज दराने ही रक्कम संचालकांकडून वसूल करण्याचे आदेश सहकार न्यायालयाने दिले आहेत. आता या कारखान्याने व्याजाचे व मुद्दलाचे पैसे भरले तर बॅंकेला चार कोटी ६४ लाख रुपये मिळणार आहेत. त्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असे या वेळी ठरले. माजी संचालक अरुण कापसे यांच्या आदित्यराज शुगरला बॅंकेने दिलेल्या पाच कोटी १९ लाख रुपयांच्या कर्जाचीही वसुली १४ टक्‍क्‍यांनी करण्याचे आदेश सहकार न्यायालयाने दिले आहेत. १४ जानेवारी २०१३ पासून ही रक्कम व्याजासह वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com