सोलापुरात अवकाळीचा दणका, झाडे कोसळली, एका मुलीचा मृत्यू

सोलापुरात अवकाळीचा दणका, झाडे कोसळली, एका मुलीचा मृत्यू

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सोलापूरसह, अक्कलकोट, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूरमधील अनेक भागांत बुधवारी (ता. १६) वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने चांगलाच दणका दिला. गेल्या आठवड्यापासून सातत्याने उन्हाची तीव्रता वाढते आहे, उकाड्यातही प्रचंड वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारच्या या पावसाने काहीसा आधार दिलेला असला, तरी या पावसाच्या तडाख्याने एका १० वर्षीय मुलीचा दुर्दैवी अंत झाला.  सोलापूर जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून सातत्याने पावसाळी वातारण तयार होते आहे. तापमानाचा पाराही जवळपास ४३ अंश सेल्सिअसवर पोचला आहे. त्यामुळे उकाड्यानेही प्रचंड हैराण केले आहे. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानकपणे वातावरणात बदल झाला, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटाने पावसाला सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत थांबून-थांबून पावसाची रिपरिप सुरू होती. अवघ्या अडीच तासांत ५५ मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद प्रशासनाकडे झाली. याच पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या मोठा तडाख्यात घराचे माळवद कोसळून दिव्या दयानंद ऊर्फ बाळू गजेली (वय १०, घोंगडे वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) या मुलीचा मृत्यू झाला. दुपारी साडेतीन ते चारदरम्यान सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. अनेक भागात वीज गायब झाली, रस्त्यावर झाडे पडली. सखल भागात पाणी साचले. ग्रामीण भागातही अचानकपणे सुरू झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांची धावाधाव झाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com