agriculture news in marathi, solapur drought subsidy issue, maharashtra | Agrowon

दुष्काळ अनुदान देण्यासाठी सोलापूरातील शेतकऱ्यांची मिळेना माहिती
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 जानेवारी 2018
दक्षिण सोलापूर तालुक्‍यात २०१५-१६ मध्ये रब्बी हंगामात ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी आलेल्या ७४ गावांतील कोरडवाहू शेतकऱ्यांनी अनुदानासाठी संबंधित गावकामगार तलाठी यांच्याकडे आपल्या बॅंक खाते क्रमांकाची माहिती त्वरित सादर करावी. माहिती न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम शासन जमा करावी लागणार आहे. 
- अमोल कदम, तहसीलदार, दक्षिण सोलापूर. 
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील २०१५-१६ मध्ये ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या गावांमधील बाधित शेतकऱ्यांना शासनाने अनुदान दिले आहे. तालुक्‍यातील २६ हजार ७३६ शेतकऱ्यांकरीता पाच कोटी ३६ लाख ५६ हजार ८९६ इतके अनुदान प्राप्त झाले आहे. त्यापैकी १० हजार ८४० शेतकऱ्यांच्या खाते क्रमांकाची माहिती उपलब्ध झाल्याने त्यांच्या बॅंक खात्यात एक कोटी ७५ लाख ५४ हजार ४३३ इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित १५ हजार ८९६ खातेदारांनी खाते नंबर न दिल्याने ही रक्कम पडून आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अन्य तालुक्‍यांतही काहीशी अशीच परिस्थिती आहे. 
 
दुष्काळ मदतीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करूनही दखल घेतली गेली नव्हती. गेल्या वर्षी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन आढावा बैठकीतही याबाबत जाब विचारला होता. पण काहीच हालचाली झाल्या नव्हत्या. त्यानंतर हिवाळी अधिवेशनातही हा विषय गाजला. त्यानंतर निधी मिळाला.
 
पण आता वेगळीच समस्या समोर आली आहे. प्रशासनानेही धीम्या गतीने काम केल्याने ही स्थिती उद्‌भवली आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी बॅंक खाते क्रमांकाची माहिती सादर केलेली नाही. त्यांनी ३१ जानेवारी २०१८ पर्यंत गाव कामगार तलाठी यांच्याकडे ती सादर करावी, असे सांगण्यात आले आहे.
 
जे शेतकरी मुदतीत माहिती देणार नाहीत, त्यांची रक्कम शासन जमा करण्यात येईल व त्यानंतर त्यांची कोणतीही तक्रार ग्राह्य मानली जाणार नाही. तसेच बॅंक खाते क्रमांकामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्यास त्याला तेच जबाबदार असतील, अशी भूमिका उलट प्रशासनाने घेतली आहे. सर्वच तालुक्‍यात याच पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळे अनुदान मिळण्यात अडचण झाली आहे.

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात एक कोटी सात लाख क्विंटल साखर...सातारा : जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या...
चार जिल्ह्यांत हरभरा खरेदीला ग्रहणऔरंगाबाद : खरेदीत सातत्य नसणे, जागेचा प्रश्‍न आणि...
हंगाम तोंडावर; पीककर्जाची प्रतीक्षा...अकोला ः  खरीप हंगाम अवघा काही दिवसांवर आला...
पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजनपावसाने ओढ दिल्याने पेरणीचे नियोजन चुकते. उपलब्ध...
ज्वारी उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रेज्वारीची पेरणी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या...
पावसाने ओढ दिल्यास योग्य नियोजन करावेपुणे  ः यंदा पावसाचा चांगला अंदाज व्यक्त...
'यंदाच साल बरं राहिलं' या आशेवर खरिपाची...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या अंतिम...
बुलडाण्यात यंदाही सोयाबीनवरच जोर राहणारअकोला : गेल्या हंगामात पाऊस व कीड रोगांनी...
नामपूर बाजार समिती निवडणुकीचा प्रचार...नामपूर, जि. नाशिक : येथील नामपूर कृषी उत्पन्न...
कर्जमाफी अर्जातील दुरुस्तीच होईना...पुणे : कर्जमाफीसाठीच्या मुदतवाढीची संधी...
उष्ण वातावरणामुळे केळीबागा संकटातअकोला  ः सतत ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान राहत...
द्राक्षाला वर्षभरासाठी विमा सुरू...सांगली ः एप्रिल छाटणी म्हणजेच खरड छाटणीनंतर...
राज्यात तूर खरेदी पुन्हा सुरू होण्याची...नवी दिल्ली : राज्यात १५ मे पासून बंद झालेली तूर...
पीकविम्याचे निकष बदला; सांगलीत आज...सांगली : अवकाळी पाऊस आणि गारपीट पावसाने द्राक्ष...
भाजपमध्ये येण्यासाठी रांग; निरंजन यांचे...मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश...
कृषिपंपांना भारनियमनाची समस्याजळगाव  ः जिल्ह्यात कृषिपंपांना भारनियमनाचा...
शेतीच्या प्रश्‍नांबाबत...जळगाव : कर्जमाफीचा घोळ, पीककर्ज वितरणाची...
पीकबदल, आंतरपिकामुळे हवामान बदलाचा सामना वाकोडीचे पद्माकर कोरडे यांची सहा एकर शेती....
सेंद्रिय शेती, वाणबदल, यांत्रिकीकरणाचा...आनंद पाटील अनेक वर्षे रासायनिक शेती करीत होते....
तंत्रज्ञानाच्या नियोजनबद्ध वापराने...कैलास, विलास, ईश्वर व किशोर ही निर्मळ कुटुंबातील...