agriculture news in marathi, Solapur farmers demands 27 rupees rate to milk | Agrowon

दुधाला २७ रुपये दर मिळालाच पाहिजे
सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

कुर्डू जि.सोलापूर : शेतकऱ्यांच्या दुधाला २७ रुपये दर दिलाच पाहिजे या व इतर विविध मागण्यांसाठी माढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लऊळ (ता. माढा) येथे बुधवारी (ता. १६) सकाळी शासनाच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध करण्यात आला. 

कुर्डू जि.सोलापूर : शेतकऱ्यांच्या दुधाला २७ रुपये दर दिलाच पाहिजे या व इतर विविध मागण्यांसाठी माढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लऊळ (ता. माढा) येथे बुधवारी (ता. १६) सकाळी शासनाच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध करण्यात आला. 

या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संदीप साठे, तालुकाध्यक्ष सौदागर जाधव, अल्पसंख्याक अध्यक्ष रफिक शेख, युवा तालुकाध्यक्ष धनंजय मोरे, जिल्हा सरचिटणीस रामभाऊ वाघमारे, विशाल नलवडे, कुर्डुवाडी शहराध्यक्ष हमीद शिकलकर, सुरेश लोंढे, भूमाता शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष मारुती जगदाळे, बालाजी सावंत, अप्पासाहेब सुर्वे, भारत चव्हाण, श्रावण जाधव, युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, जाहीर मणेर, शाहुराजे जगताप, माजी शहराध्यक्ष संजय त्रिंबके आदी मान्यवर उपस्थित होते. 

शेतकऱ्यांना शासन नियमाप्रमाणे प्रति लिटर २७ रुपये दूध दर मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, असे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी सांगितले. त्यांनी सरकारच्या धोरणावर टीकेची झोड उठवली. या वेळी संदीप साठे, धनंजय मोरे, सौदागर जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. सुमारे ४५ मिनिटे रस्ता अडवला होता. त्यामुळे अधिक मास सुरू झाला असल्याने पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी रांग लागली होती. या ‘रास्ता रोको’साठी परिसरातील व तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

इतर ताज्या घडामोडी
`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्‍त शिवार अभियानातंर्गत भूजल...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...
सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...
नगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...
सोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...
नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...
सोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...
योग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...
नाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...
बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...
प्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...
ऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...
नामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...
वजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...
कोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...
हमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...