agriculture news in marathi, Solapur in fenugreek, coriander leves rates Survive | Agrowon

सोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीचे दर टिकून
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता. ३०) भाजीपाल्याच्या दरातील तेजी कायम राहिली. विशेषतः मेथी, शेपू, कोथिंबिरीला चांगला उठाव मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता. ३०) भाजीपाल्याच्या दरातील तेजी कायम राहिली. विशेषतः मेथी, शेपू, कोथिंबिरीला चांगला उठाव मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात मंगळवारी बाजार समितीच्या आवारात भाज्यांची आवक जेमतेमच राहिली. प्रत्येकी ५ ते ८ हजार पेंढ्यांपर्यंत आवक राहिली. भाज्यांची आवक प्रामुख्याने स्थानिक भागातूनच झाली. त्यातही मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ६०० ते ११०० रुपये, कोथिंबिरीला ३०० ते ७०० रुपये आणि शेपूला ४०० ते ६०० रुपये असा दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या आवकेत सातत्याने घट होत आहे, पण मागणी वाढल्याने दरातील किरकोळ चढ-उतार वगळता तेजी टिकून आहे. मंगळवारीही पुन्हा तिच स्थिती राहिली. त्याशिवाय टोमॅटो, वांग्याचे दर मात्र स्थिर राहिले. त्यांची आवक प्रत्येकी ३० ते ४० क्विंटलपर्यंत राहिली. त्यांचीही आवक कमी होती, पण दर स्थिर राहिले.

टोमॅटोला प्रतिक्विंटलसाठी १००० ते १५०० रुपये, वांग्याला ९०० रुपये ते १३०० रुपये असा दर मिळाला. ढोबळी मिरचीच्या दरातील घसरण पुन्हा तशीच राहिली. ढोबळी मिरचीला प्रतिक्विंटल किमान ७०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १२०० रुपये असा दर मिळाला. कांद्याच्या दराची स्थितीही काहीशी अशीच होती. कांद्याची आवक २० ते ३० गाड्यांपर्यंत राहिली. कांद्याची आवक बाहेरच्या जिल्ह्यापेक्षा स्थानिक भागातूनच सर्वाधिक झाली. त्यात कांद्याला प्रतिक्विंटला किमान ४०० रुपये, सरासरी १४०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...
जैविक शेती मिशन राबविण्यास प्रारंभअकोला ः शासनाने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या डॉ....
जळगावसह रावेर मतदारसंघ भाजपकडेच?जळगाव ः आगामी लोकसभा निवडणुकीसंबंधी शिवसेना व...
किसान लाँग मार्चला जाणाऱ्या शेतकऱ्यांना...धुळे  : किसान लाँग मार्चमध्ये सहभागी...
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...