agriculture news in marathi, solapur in heavy rain | Agrowon

सोलापुरात मुसळधार पाऊस
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 जून 2018

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात बुधवारी (ता. ६) सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस गुरुवारी (ता. ७) सकाळपर्यंत बरसतच होता. मृग नक्षत्र उद्या शुक्रवारी (ता. ८) निघत आहे. पण त्या आधीच पावसाने चांगली सुरवात केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कालावधीत त्याचा जोर इतका राहिला की अवघ्या काही तासांत दोन इंच पाऊस झाला. प्रामुख्याने अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापुरात पावसाचा सर्वाधिक जोर राहिला.

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात बुधवारी (ता. ६) सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस गुरुवारी (ता. ७) सकाळपर्यंत बरसतच होता. मृग नक्षत्र उद्या शुक्रवारी (ता. ८) निघत आहे. पण त्या आधीच पावसाने चांगली सुरवात केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कालावधीत त्याचा जोर इतका राहिला की अवघ्या काही तासांत दोन इंच पाऊस झाला. प्रामुख्याने अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापुरात पावसाचा सर्वाधिक जोर राहिला.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाने उच्चांक केला आहे. सुमारे ४० ते ४४ अंश सेल्सिअस दरम्यान तापमान स्थिर राहिले. दिवसभर ऊन आणि रात्री प्रचंड उकाडा असे वातावरण राहिल्याने पावसाकडे सगळ्यांचेच डोळे लागले होते. बुधवारीही दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाचनंतर अचानकपणे वातावरणात बदल झाला आणि पावसाला सुरवात झाली. सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली पावसाची रिपरिप रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यानंतर पुन्हा मध्यरात्री पावसाने चांगलाच जोर लावला. त्यानंतर थांबून थांबून त्याची रिपरिप सुरूच होती. गुरुवारी (ता. ७) पुन्हा सकाळी सातच्या दरम्यान पावसाने सुरवात केली. अवघ्या तीन तासात सुमारे २५ मिलिमीटर इतका पाऊस झाला.

सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासात १८.५ मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. उत्तर सोलापुरातील खेड, मार्डी, कारंबा, गुळवंची, वडाळा, नान्नज, दक्षिण सोलापुरातील होटगी, वळसंग, मंद्रूप, विंचूर आणि अक्कलकोट तालुक्‍यातील चपळगाव, हन्नूर, नागणसूर भागात पावसाचा सर्वाधिक जोर राहिला. त्याशिवाय माळशिरस, पंढरपूर भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे ओढ्या-नाल्याला पाणी आलेच, पण अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साठून राहिल्याने पेरणीसाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...