सोलापूर, माढ्याचा निकाल उशिरा

सोलापूर, माढ्याचा निकाल उशिरा
सोलापूर, माढ्याचा निकाल उशिरा

सोलापूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता. २३) सकाळी ८ पासून सुरू होणार आहे. माढा व सोलापूर मतदारसंघाची मतमोजणी रामवाडी गोदामात होणार आहे. मतमोजणीदरम्यान बंद पडलेल्या ईव्हीएममधील व्हीव्हीपॅटची मतमोजणी सर्वांत शेवटी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. या दोन्ही मतदारसंघातील अंतिम आकडेवारीसह निकाल हाती येण्यास मध्यरात्र होईल, असेही ते म्हणाले. 

मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे उमेदवार प्रतिनिधी, उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, पोलिस यांची आढावा व नियोजन बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भोसले बोलत होते. माढ्याचे निवडणूक निर्णय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले उपस्थित होत्या. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वात कमी २० फेऱ्या शहर उत्तर मतदारसंघात होतील. सर्वाधिक २६ फेऱ्या या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात होतील.‘शहर मध्य’मध्ये २२, दक्षिण सोलापूर, पंढरपूर व मोहोळ विधानसभा मतदारसंघांत प्रत्येकी २४ फेऱ्या होणार आहेत. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण एक हजार ९२६ एवढी मतदान केंद्रे आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला विधानसभा मतदारसंघात सर्वांत कमी २२ फेऱ्या होणार आहेत. सर्वाधिक २७ फेऱ्या या माण विधानसभा मतदारसंघात होणार आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com