सोलापूरमधील हुमणीग्रस्त उसाचे पंचनामे करा

सोलापूरमधील हुमणीग्रस्त उसाचे पंचनामे करा
सोलापूरमधील हुमणीग्रस्त उसाचे पंचनामे करा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ऊस पिकांवर मोठ्या प्रमाणात हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने भरवशाचे पीक धोक्‍यात आले आहे. हुमणीग्रस्त नुकसानीचे सर्व पिकांचे  पंचनामे महसूल व कृषी विभागाकडून तातडीने करण्याचे आदेश देण्याविषयीची मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे रयत क्रांती संघटनेच्या वतीने कृषिमूल्य आयोगाचे सदस्य प्रा. सुहास पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

जिल्ह्यातील पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, माढा, माळशिरसह जिल्ह्यातील ऊसपट्ट्यात सध्या या रोगाने मोठे क्षेत्र व्यापले आहे. या वर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे. अन्यथा, मोठ्या संकटाला शेतकरी सामोरे जाणार आहेत. सध्या हुमणी अळी उसाच्या बेटांची मुळेच कुरतडून खात असल्याने जमिनीतून हा रोग ऊस संपूर्ण वाळल्यानंतरच शेतकऱ्यास समजतो. जिल्ह्यातील ऊस ऊत्पादक शेतकरी या किडीमुळे भयभीत झालेत. पंचनामे करून त्वरित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

या वेळी रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले, राज्य  कृषिमूल्य आयोगाचे सदस्य अच्युत गंगणे, राज्य प्रवक्ते जितू अडलकर, ऊसदर समिती सदस्य भानुदास शिंदे, माळशिरस पंचायत समिती सदस्य माऊली पाटील आदी रयतचे राज्य पदाधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com