सोलापूर बाजार समिती उमेदवारांची अंतिम यादी जाहीर

सोलापूर बाजार समिती उमेदवारांची अंतिम यादी जाहीर
सोलापूर बाजार समिती उमेदवारांची अंतिम यादी जाहीर

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर उमेदवारांच्या अंतिम यादीतून चित्र स्पष्ट झाले आहे. आता तब्बल ३५९ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. पण प्रत्यक्षात कितीजण मागे घेणार यावरच निवडणुकीचे चित्र अवलंबून असणार आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीची चुरस आणखी वाढली आहे.

प्रामुख्याने तत्कालीन माजी सभापती दिलीप माने, सौ. इंदुमती अलगोंडा, तत्कालीन संचालक अविनाश मार्तंडे, जिल्हा परिषद सदस्य अप्पासाहेब बाराचारे, शिवानंद भरले यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले. त्यांच्याकडील थकबाकीच्या कारणाने ते अपात्र ठरले. तर बाराचारे यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने, तर भरले हे स्थानिक प्राधिकरणात शिक्षक म्हणून सेवेत असल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. १९ जूनपर्यंत अर्ज माघार घेण्यास मुदत देण्यात आली आहे. थकबाकीमुळे अर्ज बाद झालेल्या उमेदवारांना पुढील तीन दिवसांमध्ये या निर्णयाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल करून दाद मागता येणार आहे. त्यानंतर दहा दिवसांत जिल्हाधिकारी यावर निर्णय देतील.

माजी आमदार दिलीप माने, अलगोंडा यांना अटकपूर्व जामीन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुमारे ३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल असलेले बाजार समितीचे तत्कालीन सभापती, माजी आमदार दिलीप माने, सौ. इंदुमती अलगोंडा, संचालक प्रवीण देशपांडेंसह आठ जणांना सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. व्ही. मोराळे यांनी बुधवारी (ता. ६) येत्या ११ जूनपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन  मंजूर केला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीची सुरू असलेली प्रक्रिया आणि तत्कालीन संचालकांवर दाखल झालेल्या गैरव्यवहाराच्या या गुन्ह्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. बुधवारी (ता. ६) न्यायालयात सुनावणी होणार असल्याने सगळ्यांचेच लक्ष वेधले होते. न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून तत्कालीन सभापती दिलीप माने यांच्यासह सहा संचालकांच्या वकिलांचे म्हणणे ऐकून न्यायाधिशांनी त्यांना ११ जूनपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. श्री. माने यांच्यासह सौ. इंदुमती अलगोंडा, प्रवीण देशपांडे, सोजर पाटील, उत्तरेश्‍वर भुट्टे, गजेंद्र गुंड या सहा जणांचा त्यामध्ये समावेश आहे. त्याशिवाय तत्कालीन सचिव धनराज कमलापुरे आणि उमेश दळवी यांनाही जामीन मंजूर झाला आहे.

गणाचे नाव    कळमण एकूण अर्ज    १६ वैध    १६ अवैध    -- अवैध उमेदवार    --

गणाचे नाव    नान्नज एकूण अर्ज    २० वैध    १९ अवैध    १ अवैध उमेदवार    अविनाश मार्तंडे   गणाचे नाव    पाकणी एकूण अर्ज    २८ वैध    २६ अवैध    २ अवैध उमेदवार    धनंजय भोसले, अविनाश मार्तंडे

गणाचे नाव    मार्डी एकूण अर्ज    १७ वैध    १४ अवैध    ३ अवैध उमेदवार    सुनील गिरे, दत्तात्रेय नागणकरे,             मनगिन भालेकर

गणाचे नाव    बोरामणी एकूण अर्ज    २४ वैध    २१ अवैध    ३ अवैध उमेदवार    सुनील रणखांगे, राजकुमार राजगुरू

गणाचे नाव    बाळे एकूण अर्ज    ९ वैध    ९ अवैध    -- अवैध उमेदवार    --

गणाचे नाव    हिरज एकूण अर्ज    १७ वैध    १३ अवैध    ४ अवैध उमेदवार    दिलीप माने, जयकुमार माने, धनंजय भोसले

गणाचे नाव    कुंभारी एकूण अर्ज    ३५ वैध    ३१ अवैध    ४ अवैध उमेदवार    जयकुमार माने,                सिद्धाराम चाकोते,             महादेव होनराव

गणाचे नाव    मुस्ती एकूण अर्ज    १९ वैध    ९ अवैध    १० अवैध उमेदवार    सिद्राम कोळी, श्रीशैल माळी, सतीश इसापुरे, प्रमोद हुच्चे, भीमाशंकर जमादार, बिरप्पा घोडके, सुनील कोळी, अण्णाप्पा बाराचारे, नागनाथ घेरडे, तुकाराम कोळेकर.

गणाचे नाव    होटगी एकूण अर्ज    ४० वैध    ३६ अवैध    ४ अवैध उमेदवार    इंदुमती अलगोंडा, सतीश इसापुरे, राजेंद्र गंगदे. एका व्यक्तीचे दोन अर्ज

गणाचे नाव    कणबस एकूण अर्ज    २९ वैध    २९ अवैध    -- अवैध उमेदवार    --

गणाचे नाव    मंद्रूप एकूण अर्ज    १४ वैध    १२ अवैध    २ अवैध उमेदवार    इंदुमती अलगोंड. दोन अर्ज

गणाचे नाव    कंदलगाव एकूण अर्ज    २२ वैध    २२ अवैध    -- अवैध उमेदवार    --

गणाचे नाव    भंडारकवठे एकूण अर्ज    २५ वैध    २४ अवैध    १ अवैध उमेदवार    शिवानंद भरले

गणाचे नाव    औराद एकूण अर्ज    २७ वैध    २६ अवैध    १ अवैध उमेदवार    अशोक देवकते

गणाचे नाव    व्यापारी एकूण अर्ज    ३० वैध    ३० अवैध    -- अवैध उमेदवार    --

गणाचे नाव    हमाल-तोलार एकूण अर्ज    २२ वैध    २२ अवैध    -- अवैध उमेदवार    --

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com