agriculture news in Marathi, solapur market samalochan | Agrowon

सोलापुरात मेथी, शेपू, कोथिंबिरीचे दर पुन्हा तेजीत
सुदर्शन सुतार
मंगळवार, 16 एप्रिल 2019

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात मेथी, शेपू, कोथिंबिरीची आवक मागणीच्या प्रमाणात अगदीच कमी राहिली; पण चांगला उठाव असल्याने दरातील तेजी टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात रोज मेथीची सात हजार पेंढ्या, कोथिंबिरीची ३ हजार पेंढ्या, तर शेपूची आवक ४ हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. गेल्या दोन आठवड्यांपासून भाज्यांची आवक आणि दरात किरकोळ चढ-उतार वगळता दर तेजीत आणि टिकून आहेत. भाज्यांची सगळी आवक ही स्थानिक भागातूनच झाली. 

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात मेथी, शेपू, कोथिंबिरीची आवक मागणीच्या प्रमाणात अगदीच कमी राहिली; पण चांगला उठाव असल्याने दरातील तेजी टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात रोज मेथीची सात हजार पेंढ्या, कोथिंबिरीची ३ हजार पेंढ्या, तर शेपूची आवक ४ हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. गेल्या दोन आठवड्यांपासून भाज्यांची आवक आणि दरात किरकोळ चढ-उतार वगळता दर तेजीत आणि टिकून आहेत. भाज्यांची सगळी आवक ही स्थानिक भागातूनच झाली. 

मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ७०० ते १२०० रुपये, कोथिंबिरीला ८०० ते १३०० रुपये आणि शेपूला ४०० ते ६०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय टोमॅटो, वांगी आणि ढोबळी मिरची यांच्या दरातील तेजीही टिकून राहिली. टोमॅटोची आवक २० ते ५० क्विंटल, वांग्याची ६० ते ८० क्विंटल आणि ढोबळी मिरचीची आवक १० ते १५ क्विंटलपर्यंत जेमतेम राहिली. 

टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ६०० रुपये आणि सर्वाधिक १३०० रुपये, वांग्याला किमान ३०० रुपये, सरासरी १३०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये तर ढोबळी मिरचीला किमान १००० रुपये, सरासरी  १२०० रुपये आणि सर्वाधिक १६०० रुपये असा दर मिळाला. 

भेंडी आणि गवारीचे दरही या सप्ताहात पुन्हा तेजीत राहिले. भेंडीला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये तर गवारला किमान १५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये असा दर मिळाला.

इतर बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
पुण्यात कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरचीचे दर...पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ५०० ते ३०००...साताऱ्यात १५०० ते २००० रुपये सातारा येथील...
जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ७०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिकमध्ये ढोबळी मिरचीची आवक १६३...
सोलापुरात कांदा दरात किंचित सुधारणासोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे बाजार समितीत श्रावण घेवडा,...पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
राजस्थान, मध्य प्रदेशातून गव्हाच्या...जळगाव : बाजार समितीमधील किरकोळ व घाऊक विक्रेते,...
परभणीत काकडीला प्रतिक्विंटल ७०० ते १५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात लिंबू प्रतिक्विंटल ८०० ते ६०००...जळगावात २४०० ते ४००० रुपये  जळगाव : कृषी...
कोल्हापुरात टोमॅटोला प्रति दहा किलोस ५०...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सोलापुरात मेथी, शेपूला उठाव, दरात...सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळीच्या दरात ६० रुपयांनी...जळगाव  ः खानदेशात केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मानवत बाजार समितीत उद्यापासून हळद खरेदीमानवत, जि. परभणी ः मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार...
अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याला मागणीपुणे ः मंगळवारी (ता. ७) साजऱ्या होणाऱ्या अक्षय...
औरंगाबादेत आंबा ४ हजार ते १० हजार रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत शेवग्याला प्रतिक्विंटल १५०० ते...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात काकडी प्रतिक्विंटल ५०० ते १९००...अकोल्यात प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये अकोला ः...