agriculture news in Marathi, Solapur milk federation has loss six crore rupees, Maharashtra | Agrowon

सोलापूर दूध संघाला सहा कोटींचा तोटा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 एप्रिल 2018

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने एकूण दूध संकलनातील शिल्लक दूध विक्रीसाठी परजिल्ह्यांत सर्वेक्षण केले. परंतु, शासनाने दरवाढीचा निर्णय घेतल्यापासून आणि अतिरिक्‍त दूध शासनाकडून योग्य दराने खरेदी न केल्याने जिल्हा दूध संघाला गेल्या १० महिन्यांत सुमारे पाच कोटी ८५ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष, आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. 

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने एकूण दूध संकलनातील शिल्लक दूध विक्रीसाठी परजिल्ह्यांत सर्वेक्षण केले. परंतु, शासनाने दरवाढीचा निर्णय घेतल्यापासून आणि अतिरिक्‍त दूध शासनाकडून योग्य दराने खरेदी न केल्याने जिल्हा दूध संघाला गेल्या १० महिन्यांत सुमारे पाच कोटी ८५ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष, आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. 

जिल्हा दूध संघाचे सध्याचे रोजचे संकलन सव्वा लाख लिटर आहे. त्यापैकी पॅकिंगद्वारे ६० हजार लिटर, तर टॅंकरद्वारे सुमारे ५७ हजार लिटर दूध विक्री केले  जाते. परंतु, शासनाने सहकारी दूध संघासाठी ३-५, ८-५च्या दुधाला प्रतिलिटर २७ रुपयांचा दर देणे बंधनकारक केल्याने संघाला तोटा सहन करावा लागत आहे.

शिल्लक असलेल्या दुधाची विल्हेवाट वेळेवर लावणे गरजेचे असल्याने लातूर, नांदेड, परभणी, बीड, औरंगाबाद, अकोला, अमरावती, पुणे व हैदराबाद या ठिकाणी दुधाच्या मागणीचे सर्वेक्षण केले असून, त्या ठिकाणी पॅकिंगद्वारे दूध विक्रीचे नियोजन असल्याचे श्री. परिचारक यांनी सांगितले; पण त्यातही अडचणी आहेत. शिवाय खासगी दूध संघाचे पेव जिल्ह्यात असल्याने सहकारी दूध संघासमोर आव्हान उभे राहिले आहे. 

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकारी दूध संघाची धडपड सुरू आहे. शासनाने सहकारी दूध संघांबरोबरच खासगी दूध संघांवरही निर्बंध आणणे शेतकरीहिताचे असल्याचे ते म्हणाले. त्यातच दूध पावडरचे दरही घसरल्याने अडचणी वाढतच आहेत, असेही श्री. परिचारक म्हणाले. दूध उत्पादक शेतकऱ्यांना अन्य राज्यांप्रमाणे थेट अनुदान देण्याची, अतिरिक्‍त दूध शासनाने हमीभावाने खरेदी करण्याची गरज, असेही ते म्हणाले. श्री. परिचारक भारतीय जनता पक्षाचे विधीमंडळातील सहयोगी सदस्य आहेत. त्यांनी स्वतःच आता सरकारच्या धोरणावर बोट ठेवल्याने त्यांच्या बोलण्याला आता महत्त्व आले आहे.

इतर अॅग्रो विशेष
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदानपुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...
मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा...औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व...
नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच...
जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः...मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी...
चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे...
वादळी पावसाने दाणादाणपुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा,...
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक...माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-...
खानदेशात चाराटंचाईचे संकटजळगाव : खानदेशातील पशुधनाच्या रोजच्या गरजेपेक्षा...