agriculture news in marathi, In Solapur, the onion trade with vegetables becomes OK | Agrowon

सोलापुरात भाजीपाल्यासह कांद्याचे व्यवहार सुरळीत
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 जानेवारी 2018

सोलापूर ः भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र उमटले. मंगळवारी (ता.२) बाजार समितीतील माथाडी कामगारांनी अचानकपणे बंद पुकारल्याने शेतकऱ्यांचे हाल झाले. त्यानंतर बुधवारीही (ता.३) पुन्हा दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रव्यापी बंदमुळे भाजीपाल्यासह कांद्याचे लिलाव रखडण्याची शक्‍यता होती; पण हे सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले.

दुसरीकडे जिल्ह्यात किरकोळ घटना वगळता अक्कलकोट, पंढरपूर, माढा, माळशिरस भागात तणावपूर्ण शांतता राहिली. बाजार समितीतील व्यवहारासह दूध व अन्य भाजीपाल्याचीही आवक-जावक सुरळीत झाली.

सोलापूर ः भीमा-कोरेगाव घटनेचे पडसाद सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र उमटले. मंगळवारी (ता.२) बाजार समितीतील माथाडी कामगारांनी अचानकपणे बंद पुकारल्याने शेतकऱ्यांचे हाल झाले. त्यानंतर बुधवारीही (ता.३) पुन्हा दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रव्यापी बंदमुळे भाजीपाल्यासह कांद्याचे लिलाव रखडण्याची शक्‍यता होती; पण हे सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले.

दुसरीकडे जिल्ह्यात किरकोळ घटना वगळता अक्कलकोट, पंढरपूर, माढा, माळशिरस भागात तणावपूर्ण शांतता राहिली. बाजार समितीतील व्यवहारासह दूध व अन्य भाजीपाल्याचीही आवक-जावक सुरळीत झाली.

बाजार समितीच्या आवारात मंगळवारी मध्यरात्रीच माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली होती; पण आज (बुधवारी) बंद असूनही हमालांनी त्यात सहभागी न होता, व्यवहार सुरळीत ठेवण्यास मदत केल्याने बाजार समितीतील भाजीपाल्यासह कांद्याच्या गाड्या उतरणे आणि भरण्यासह सर्व व्यवहार सुरळीत झाले.

त्यामुळे शेतकऱ्यांनीही सुटकेचा निःश्‍वास टाकला. बाहेरून येणाऱ्या दूध आणि भाजीपाल्याच्या गाड्याही सकाळीच मार्केट यार्डात पोचल्या आणि काही वेळातच त्या विक्री केंद्रावर पोचल्याने वाहतुकीत फारशी अडचण झाली नाही; जिल्ह्यात सुमारे ३ हजारांहून अधिक पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दूध वाहतूकही सुरळीत

जिल्ह्यात जिल्हा दूध संघ आणि तालुकास्तरावरील अन्य खासगी संघासह जिल्ह्याचे रोजचे दूध संकलन सुमारे ११ ते १२ लाख लिटर आहे. पण हे सगळे दूध सकाळीच संकलन होऊन त्या-त्या शीतगृह केंद्रावर पोचल्याने दूध वाहतुकीलाही बंदची फारशी झळ बसली नाही. दुधाची वाहतूक सुरळीत सुरू होती.

इतर बातम्या
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
बफर स्टॉकच्या शक्‍यतेने साखर १००...कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून मंदीच्या...
दापोलीत उद्यापासून जॉइंट ॲग्रेस्कोपुणे ः यंदा ४६ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
कापूस बियाणे सत्यता पडताळण्यासाठी ‘क्‍...जळगाव ः बोगस कापूस बियाण्याला आळा घालण्यासह...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...