agriculture news in marathi, solapur in rain | Agrowon

सोलापुरात भीजपाऊस, खरीप पिकांना दिलासा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

सोलापूर ः प्रदीर्घ विश्रांतीनंतर सोलापूर जिल्ह्यात पावसाने गुरुवारी (ता. १६) अखेर दमदार पुनरागमन केले. बुधवारी रात्रीपासूनच जिल्ह्यातील अनेक भागांत भीजपाऊस चांगलाच व्यापला होता. गुरुवारी पहाटे मात्र त्याचा जोर चांगलाच वाढला. दरम्यान, या पावसाने खरिपातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सोलापूर ः प्रदीर्घ विश्रांतीनंतर सोलापूर जिल्ह्यात पावसाने गुरुवारी (ता. १६) अखेर दमदार पुनरागमन केले. बुधवारी रात्रीपासूनच जिल्ह्यातील अनेक भागांत भीजपाऊस चांगलाच व्यापला होता. गुरुवारी पहाटे मात्र त्याचा जोर चांगलाच वाढला. दरम्यान, या पावसाने खरिपातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदा जूनच्या सुरवातीला चांगला पाऊस झाला. त्यावरच खरिपाच्या पेरण्या उरकल्या. जिल्ह्याचे खरिपाचे क्षेत्र ७९ हजार हेक्टर निश्चित असताना, यंदा दुप्पट क्षेत्रावर पेरण्या झाल्या. त्यानंतर किरकोळ हजेरी वगळता पावसाने जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ पाठ फिरवली आणि खरीप हंगाम धोक्यात आला. गेल्या पंधरवड्यापासून पावसाअभावी पिके माना टाकू लागले होते. पण या पावसाने या पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मूग, उडीद आता अंतिम टप्प्यात आहे. पण सोयाबीन, तुरीला याचा चांगला फायदा होणार आहे.

जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट, मोहोळ मंगळवेढा, दक्षिण सोलापूरसह उत्तर सोलापूर तालुक्यांतील काही गावांमध्ये बुधवारी दुपारपासून रिमझिम पाऊस सुरू झाला होता. सायंकाळी त्यात थोडासा वेग वाढला. पण गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. पाऊस पुन्हा सुरू झाल्याने पेरणी झालेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तसेच पावसाअभावी रखडलेली कांदा लागवडही आता वेग घेणार आहे.

‘उजनी’ही ५० टक्क्यांच्या दिशेने
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात. तसेच पुणे जिल्ह्यातही पाऊस सुरू झाल्याने उजनीकडे येणारा विसर्ग वाढला आहे. पुणे जिल्ह्यातील काही धरणांमधून अतिरिक्त पाणी पुढे सोडण्यात येत आहे. दुपारी मिळालेल्या माहितीनुसार उजनीत ४१.७५ टक्क्यांवर पोचला आहे. पाण्याची पातळी ४९३.८४० मीटर झाली आहे. एकूण पाणीसाठा २४३६.३० दलघमी इतका झाला आहे. त्यापैकी ६३९.४९ दलघमी इतका उपयुक्त साठा आहे. दौंडकडून २० हजार २३१ क्युसेक विसर्ग सुरू होता. हा विसर्ग असाच प्रवाहित राहिला, तर येत्या चार दिवसांत धरणाचा साठा ५० टक्क्यांवर पोचण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
उत्तर महाराष्ट्रात टंचाईच्या झळा तीव्रनाशिक : भूजल पातळीत वेगाने घट होत असल्याने उत्तर...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
‘वसाका`च्या गळीत हंगामास प्रारंभकळवण, जि. नाशिक : विठेवाडी येथील वसंतदादा पाटील...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
शेतीप्रश्नांसाठी तरुणांच्या चळवळीची गरज...वैराग, जि. सोलापूर : ‘‘शेतीचे प्रश्न वाढतायेत, ते...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...