agriculture news in marathi, Solapur receives artificial rain | Agrowon

सोलापूरात कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी
तात्या लांडगे
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

सोलापूर - सोलापुरात मागील चार दिवसांपासून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येत आहे. रडार च्या माध्यमातून आकाशातील पाण्याच्या ढगांचा वेध घेऊन क्षार फवारले जात आहेत. त्या प्रयोगाला बुधवारी, यश आले आणि सोलापूरात तब्बल दोन - अडीच तास हलका पाऊस पडला. त्यामुळे वाया जात असलेल्या खरीप पिकांना दिलासा मिळाला.

मागील ३०-३५ दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे अक्कलकोट, माढा, करमाळा, सांगोला, मोहोळ, मंगळवेढा, बार्शी या तालुक्यांतील फुलोऱ्यात आलेली खरीप पिके वाया जात आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उडीद, मूग, सोयाबीन या पिकांचा समावेश आहे.

सोलापूरच्या २०० किलोमीटर परिसरात सप्टेंबर महिन्यापर्यंत २४० तास कृत्रिम पावसाचा प्रयोग होतोय. त्यातील आता सुमारे ७२ तास संपले आहेत. मात्र, मागील दोन-तीन दिवसांपासून सोलापूर परिसरात पाण्याचे ढग निर्माण होत आहेत. कृत्रिम पाऊस पडण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने दोन 'एअरक्राफ्ट' विमानांच्या सहाय्याने त्या ढगांवर क्षारांची फवारणी करण्यात येत आहे.

कृत्रिम पावसाच्या सर्व प्रक्रिया पार पाडल्या आहेत. क्षारांची फवारणीही केली असून पडलेला व पडणारा पाऊस कृत्रिम कि नैसर्गिक हे आत्ताच सांगणे कठिण आहे. परंतु, कृत्रिम पावसासाठी बुधवारी, सकाळपासून वातावरण पोषक होते. त्याची माहिती मिळताच अवकाशातील पाण्याच्या ढगांवर सर्व प्रयोग केले.
 - डॉ. शिवसाई दिक्षित, वैज्ञानिक

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...