agriculture news in marathi, Solapur sugarcane farmers get relief as price fixed | Agrowon

सोलापूरात सहकारमंत्र्यांच्या कारखान्याने ऊसदराची कोंडी फोडली
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

 स्वाभिमानी, रयतसह शेतकरी संघटनांनाही मान्य 
सोलापूर ः गेल्या पंधरा दिवसांपासून ऊसदराच्या प्रश्नावरून सोलापूर जिल्ह्यात शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याने आंदोलनाची धग वाढली होती, पण मंगळवारी (ता.२१) सायंकाळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्याने एफआरपी आणि ४०० रुपये असा दर जाहीर केला. या निर्णयाने जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटली आहे. 

 स्वाभिमानी, रयतसह शेतकरी संघटनांनाही मान्य 
सोलापूर ः गेल्या पंधरा दिवसांपासून ऊसदराच्या प्रश्नावरून सोलापूर जिल्ह्यात शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याने आंदोलनाची धग वाढली होती, पण मंगळवारी (ता.२१) सायंकाळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्याने एफआरपी आणि ४०० रुपये असा दर जाहीर केला. या निर्णयाने जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटली आहे. 

भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा कारखान्याचे संचालक शहाजी पवार, चेअरमन महेश देशमुख यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, रयत संघटनेचे दीपक भोसले, मनसेचे दिलीप धोत्रे, जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांची बैठक घेऊन ऊसदरासंबंधी चर्चा केली, त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती दिली. 
याबाबत श्री. पवार म्हणाले, ‘‘आम्ही शेतकरी संघटनेशी चर्चा केली. या आंदोलनात सहकारमंत्री आणि त्यांच्याच कारखान्याला टार्गेट केले जात होते, पण कुठे तरी हे थांबले पाहिजे, या हेतूने सहकारमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली आहे आणि निर्णय घेतला. अन्य कारखान्यांनी त्यापद्धतीने निर्णय घ्यावा.’’

या निर्णयाबाबत स्वाभिमानीचे नेते तुपकर म्हणाले, ‘‘सहकारमंत्र्यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर, सांगलीमध्ये एफपआरपी आणि २०० रुपये मिळाले. सोलापुरात एफआरपी आणि ४०० रुपये मिळाले आहेत, अन्य कारखान्यांनी या पद्धतीने दर द्यावा, नाही तर संबंधित कारखान्यावर गुन्हे दाखल करावेत, पण कारखाने निर्णय घेत नसतील, तर त्या कारखान्यासमोर पुन्हा आंदोलन करू’’
प्रभाकर देशमुख, दीपक भोसले यांनीही अशीच भूमिका मांडली आणि या निर्णयाला पाठिंबा दिला.

ऊस तुटल्यापासून १४ दिवसांत पैसे 
ऊस तुटल्यापासून १४ दिवसांत पैसे शेतकऱ्यांना मिळायला हवेत, अन्य कारखाने निर्णय घेणार नसतील, पैसे देणार नसतील तर सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन आंदोलनाची दिशा ठरवू, असे श्री. तुपकर म्हणाले. 

असा असेल तोडगा
एफआरपी अधिक ४०० रुपये देण्यात येणार अाहेत. त्यापैकी एकरकमी एफआरपी आणि ३०० रुपये आणि उर्वरित १०० रुपये महिनाभराने देण्यात येणार अाहेत.

इतर बातम्या
'इस्मा'च्या उपाध्यक्षपदी रोहित पवार...शिर्सुफळ, ता. बारामती, जि, पुणे : इंडियन...
डाळिंबाच्या प्रश्‍नापासून सरकारने पळ...निमगाव केतकी, जि. पुणे ः सरकारच्या...
आधार लिंकची मुदत आता ३१ मार्चनवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार)...
अंतराळात 'केप्लर-९०आय' हे नवीन सौर मंडळ...नवी दिल्ली: नासाच्या मोठ्या केप्लर डिस्कव्हरी या...
कृषी आयुक्तालयातील दक्षता पथक प्रमुखाची...पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तालयातील दक्षता...
धान, बोंड अळीग्रस्तांना मदत : पांडूरंग...नागपूर ः गुलाबी बोंड अळीमुळे २० जिल्ह्यांतील...
खेड शिवापूर येथे उभारणार उपबाजार पुणे ः पुणे बाजार समितीमधील वाढलेले व्यवहार आणि...
अकोला जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तातडीने...अकोला : सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी...
कोल्हापूर बाजार समिती करणार बीओटी...कोल्हापूर : कोल्हापूर बाजारसमितीला स्वत: शीतगृह...
बोंडअळीग्रस्त कपाशीचे पंचनामे सुरूपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
विनाअनुदानित कृषी महाविद्यालयांचे...पुणे : राज्यातील विनाअनुदानित कृषी...
विदर्भातील प्रक्रिया उद्योगांसाठी लवकरच...नागपूर : ज्यूस उद्योग तसेच प्रक्रियेकामी उपयोगी...
नाशिकमध्ये ८३ आत्महत्याग्रस्त कुटुंबे...नाशिक : शेतकरी आत्महत्येच्या घटनांना...
शेतीमालाची प्रतवारी, चाळणी सामग्री...पुणे : शेतीमालाची प्रतवारी व चाळणी सामग्री...
बोंड अळीला शासन, बियाणे कंपन्याच...जळगाव ः कपाशीचे बॅसीलस थुरीलेंझीस (बीटी) बियाणे...
शेतमाल खरेदीतील चुका शोधून एक महिन्यात...पुणे: दर्जा असूनही हमीभावाने शेतमालाच्या खरेदीत...
कृषिपंपांची काहींना चुकीची वीजबिले :...नागपूर ः सरकारने कृषिपंपांचे आठ हजार कोटींचे दंड...
`क्रॉपसॅप`मधील चार वर्षांच्या 'पीएफ'...पुणे : राज्यातील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प...
किमान तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात कोरडे हवामान असून हळूहळू थंडी...
गुजरातमध्ये भाजपच येणार; राहुल गांधींचा...अधिकृतरित्या राहुल गांधी अध्यक्ष झाल्यामुळे...