सोलापुरात भाज्या वधारल्या

सोलापुरात भाज्या वधारल्या
सोलापुरात भाज्या वधारल्या

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडीला मागणी वाढली. त्यांचे दरही टिकून राहिले, तर भाज्याही या सप्ताहात चांगल्याच वधारल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवारची रोज १० ते १५ क्विंटल, भेंडीला १० ते १२ क्विंटल अशी आवक राहिली. या दोन्हींची आवक स्थानिक भागातूनच झाली. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांना मागणी वाढते आहे. पण, मागणीच्या तुलनेत आवक कमीच असल्याने त्यांचे दर टिकून आहेत. गवारला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये तर भेंडीला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर राहिला. त्याशिवाय ढोबळी मिरची, कोबीलाही मागणी होती, शिवाय त्यांचे दरही टिकून राहिले. ढोबळी मिरचीला प्रतिक्विंटल किमान १००० रुपये, सरासरी १३०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये आणि कोबीला किमान ६०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये असा दर मिळाला. या सप्ताहात भाज्यांच्या दरात मात्र काहीशी सुधारणा झाली.

भाज्यांची आवक दर सप्ताहाप्रमाणेच जेमतेम राहिली. भाज्यांची आवक रोज प्रत्येकी १० ते १५ हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. त्यात मेथी, कोथिंबीर, शेपूला उठाव राहिला. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी ४०० ते ५०० रुपये, मेथीला १२०० ते २००० रुपये आणि शेपूला २०० ते ३०० रुपये असा दर मिळाला.

कांद्याच्या दरातील चढ-उतार या सप्ताहातही कायम राहिला. कांद्याची आवक रोज १० ते २० गाड्यापर्यंत झाली. कांद्याची सर्वाधिक आवक स्थानिक भगातूनच झाली. पण दर काहीसे टिकून राहिले. कांद्याला प्रतिक्विंटल किमान २०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com