agriculture news in marathi, solar agri pumps wiil istribute in state, mumbai, mumbai | Agrowon

राज्यात होणार सात हजार सौर कृषिपंपांचे वाटप
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

मुंबई : पारंपरिक वीज वापरात बचत करण्याच्या उद्देशाने राज्यात अटल सौर कृषिपंप योजनेअंतर्गत सात हजार सौर कृषिपंप वाटपास मंत्रिमंडळाने बुधवारी (ता. ३) मान्यता दिल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

मुंबई : पारंपरिक वीज वापरात बचत करण्याच्या उद्देशाने राज्यात अटल सौर कृषिपंप योजनेअंतर्गत सात हजार सौर कृषिपंप वाटपास मंत्रिमंडळाने बुधवारी (ता. ३) मान्यता दिल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर श्री. बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, की या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा पिकांना सिंचन करणे शक्य होईल. ही संपूर्ण योजना महाऊर्जाकडून राबविण्यात येईल. योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सौर कृषिपंपांपैकी २५ टक्के पंप हे ३ अश्वशक्तीचे, तर ७५ टक्के पंप ५ अश्वशक्तीचे असतील. ३ व ५ अश्वशक्ती पंपांच्या एकूण उद्दिष्टापैकी २२.५ टक्के पंप अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी राखीव राहणार आहेत. उर्वरित ७७.५ टक्के पंप सर्वसाधारण वर्गातील लाभार्थ्यांसाठी राहतील. पंपापोटी ५ टक्के हिस्सा शेतकऱ्याला भरावा लागणार आहे. ९५ टक्के वाटा  केंद्र आणि राज्य शासन उचलणार आहे.

कृषिपंपाचा हमी कालावधी ५ वर्षांचा व सोलर मोड्यूल्सची हमी १० वर्षांची असणार आहे. कृषिपंप पुरवठाधारकावर ५ वर्षांसाठी पूर्ण देखभाल व दुरुस्ती करार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. सिंचनाची सोय असलेले शेतकरी या योजनेस पात्र ठरणार आहेत. तसेच, त्या शेतकऱ्याकडे पारंपरिक पद्धतीने वीज जोडणी नसावी. ५ एकरांपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्याला ३ अश्वशक्ती, तर ५ एकरांपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्याला ५ अश्वशक्तीचा पंप देता येणार आहे.

पारंपरिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी, वनविभागाचे प्रमाणपत्र न मिळालेले शेतकरी, महावितरणकडे पैसे भरून वीज जोडणी प्रलंबित असलेले शेतकरी, ज्यांना नजीकच्या काळात वीज जोडणी मिळणार नाही असे शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, शासनाच्या धडक सिंचन योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य राहील. वैयक्तिक, सामुदायिक शेततळे, बारमाही वाहणारी नदी, नाल्याशेजारील शेतजमीनधारकही या योजनेसाठी पात्र राहतील.

शासनाच्या निकषानुसार लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. तहसीलदार, जिल्हा कृषी अधीक्षक, समाज कल्याण सहायक आयुक्त, भूजल सर्वेक्षणचे वरिष्ठ वैज्ञानिक, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता आणि महाऊर्जाचे विभागीय व्यवस्थापक यांचा या समितीत समावेश असेल. राज्य स्तरावरील सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रधान सचिव, ऊर्जा हे योजनेचे नियंत्रण करणार आहेत.

१४ हजार हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली
``या योजनेअंतर्गत १४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. योजनेमुळे कृषिपंप ग्राहकांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये ६३ कोटींची बचत होईल. क्रॉस सबसिडीही १६८ कोटींनी कमी होईल. वीजदर कमी होतील. पारंपरिक व अपारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या वीजनिर्मितीतही बचत होणार आहे. याशिवाय राज्य शासनाद्वारे राज्यात एक लाख सौर कृषिपंप बसवण्यासाठी नवीन योजना तयार करण्यासही मंत्रिमंडळाने या वेळी मान्यता दिली आहे``, असे श्री. बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

असे असेल पंपांचे वितरण आणि किंमत

  • ३ अश्‍वशक्ती   -  २ लाख ४० हजार रुपये किंमत
  • ५ अश्‍वशक्ती  -  ३ लाख २५ हजार रुपये किंमत
  • ३ अश्‍वशक्ती  -  १७५० पंप बसविणार
  • ५ अश्‍वशक्ती  -  ५२५० पंप बसविणार

इतर अॅग्रो विशेष
जागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...
पाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...
विदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...
मराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...
खानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...
'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...
साखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...
कापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...
कृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...
धुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
दुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...
आणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...
मेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...
सिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...
पीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...
आपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...