सौरऊर्जेकडे वळावेच लागणार : राज्यपाल सी. विद्यासागर राव

सौरऊर्जेकडे वळावेच लागणार : राज्यपाल सी. विद्यासागर राव
सौरऊर्जेकडे वळावेच लागणार : राज्यपाल सी. विद्यासागर राव

पुणे : ऊर्जा टंचाईवर मात करण्याचे प्रयत्न करीत असतानाच आपण स्वच्छ, शाश्वत आणि नवीनीकरण ऊर्जा स्राेतांचा वापर करायला हवा. देशातील नागरी आणि औद्योगिकरणाची उर्जेची वाढती गरज भागविण्यासाठी सौरऊर्जा हा अनिवार्य पर्याय उरला आहे. यामुळे सौरऊर्जेकडे वळावेच लागणार आहे. सौरऊर्जा निर्मितीसाठी आणि वापरात महाराष्ट्राने आघाडीवर राहण्यासाठी राज्य शासनाने अधिकची आर्थिक तरतूद करावी, अशी अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली. पुणे येथील राजभवन परिसरात एक मेगावाॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे उद्‍घाटन रविवारी (ता.५) राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, मेडाचे महासंचालक राजाराम माने आदी उपस्थित होते.  राज्यपाल राव म्हणाले, ‘केंद्र सरकारने सौरऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात नवनवीन उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय सोलर मिशनच्या अंतर्गत २०२२ पर्यंत २० हजार मेगावाॅटवरून एक लाख मेगावाॅट सौरऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. ऊर्जा टंचाईवर मात करण्याचे प्रयत्न करीत असतानाच आपण स्वच्छ, शाश्वत आणि नवीनीकरण ऊर्जा स्राेतांचा वापर करायला हवा. आपल्या देशातील लोकांची आणि औद्योगिकरणाची वाढती गरज भागविण्यासाठी आपल्याला सौरऊर्जेकडे वळावेच लागेल.'' प्रास्ताविक वेणुगोपाल रेड्डी यांनी केले, तर मेडाचे महासंचालक राजाराम माने यांनी आभार मानले. शेतीचे फीडर सौरऊर्जेवर रूपांतरित करणार : मुख्यमंत्री राज्य शासनाने वीज निर्मितीबरोबरच वीज बचतीचेही धोरण आखले आहे. याद्वारे एक हजार मेगावाॅट वीज बचत केली जाऊ शकते. शेतीचे फिडर सौरऊर्जेवर रुपांतरीत करणार आहोत. त्यामुळे विजेपोटी द्यावी लागणाऱ्या अनुदानात बचत होईल. राळेगणसिद्धी येथे पहिल्या फिडरचे भूमिपूजन झाले आहे. उपसा सिंचन योजनाही सौरऊर्जेवर चालवण्याचा विचार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com