agriculture news in marathi, solar power project will implement in Colleges, nagpur, maharashtra | Agrowon

`माफसू`ची महाविद्यालये उजळणार सौरऊर्जेने
टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

माफसूअंतर्गत असलेल्या सर्वच महाविद्यालयांत सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वीत होणार आहे. नागपुरातील पशुवैद्यक महाविद्यालयापासून याची सुरवात केली आहे. राज्यातील इतर महाविद्यालयाच्या इमारतींवरदेखील ही यंत्रणा बसवण्यात येईल. त्या माध्यमातून विजेवरील खर्च कमी होण्यास मदत मिळेल.
- डॉ. आशिष पातूरकर, कुलगुरू, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर.

नागपूर  ः विजेवरील खर्च कमी करण्यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने सौरऊर्जेला प्राधान्य दिले आहे. त्याअंतर्गत राज्यातील सर्वच महाविद्यालयांच्या छतावर सौर पॅनल बसवून वीजनिर्मिती केली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरवात नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयातून करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत राज्यात सहा पशुवैद्यक महाविद्यालये आहेत. यातील पाच पदवी महाविद्यालये असून, अकोला येथे एकमेव पदव्युत्तर महाविद्यालय आहे. उदगीर व नागपूर येथे दोन मत्स्यविज्ञान, तसेच नागपूर व पुसद (जि. यवतमाळ) येथे डेअरी तंत्रज्ञान महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात होणाऱ्या पारंपरिक विजेवर लाखो रुपयांचा खर्च वर्षाकाठी विद्यापीठ प्रशासनाला करावा लागतो. वाणिज्यिक वापराची वीज आकारणी महावितरणकडून महाविद्यालयांना केली जाते. त्यामुळे हा खर्च अधिकच वाढतो.

त्यावर उपाय म्हणून माफसू प्रशासनाने सौरऊर्जेवर वीजनिर्मितीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. पुणे येथील एका कंपनीमार्फत हे काम निशुल्क करून दिले जाणार आहे. संबंधित कंपनीला केंद्र शासनाच्या अपारंपरिक व ऊर्जास्त्रोत मंत्रालयाच्या वतीने या कामाचा निधी दिला जाईल. त्यामुळे माफसूवर अतिरिक्‍त खर्चाचादेखील बोजा पडणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

सौर पॅनलच्या माध्यमातून मिळणारी वीज महावितरणच्या फिडरला दिली जाईल; त्यानंतर महावितरणकडून तीन रुपये २६ पैसे युनिटने माफसू परत वीज खरेदी करेल. यापूर्वी प्रतियुनिट १० रुपयांपेक्षा अधिक पैसे वीज वापरापोटी खर्ची होत होते.  याप्रकल्पामुळे विजेवरील खर्चात मोठी बचत होणार आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...