agriculture news in marathi, solar project starts in schools, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यातील ६७ शाळांना सौर प्रकल्प
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 एप्रिल 2019

जळगाव  ः  जिल्हा परिषद शाळांमधील वीजप्रश्‍न अनेकदा निर्माण होतो. शाळा डिजिटल झाल्यानंतर वीजबिलांच्या थकीत रकमेमुळे वीजजोडणी (कनेक्‍शन) कट करण्याची नामुष्की येते. त्यावर पर्याय म्हणून शाळांना सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यानुसार जिल्ह्यातील ६७ शाळांवर सौर प्रकल्प बसविण्यात येणार आहेत.
 

जळगाव  ः  जिल्हा परिषद शाळांमधील वीजप्रश्‍न अनेकदा निर्माण होतो. शाळा डिजिटल झाल्यानंतर वीजबिलांच्या थकीत रकमेमुळे वीजजोडणी (कनेक्‍शन) कट करण्याची नामुष्की येते. त्यावर पर्याय म्हणून शाळांना सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यानुसार जिल्ह्यातील ६७ शाळांवर सौर प्रकल्प बसविण्यात येणार आहेत.
 

महावितरण’च्या थकित वीजबिलांमुळे बहुतांश शाळांची वीजजोडणी कट करण्यात येते. जिल्ह्यातील एक हजार ८३२ शाळांपैकी एक हजार ६३० शाळा डिजिटल झाल्या आहेत. वीजपुरवठा नसल्याने शाळा डिजिटल करण्यालाही उपयोग होत नाही. अर्थात डिजिटल शाळेकरिता घेण्याचे किट पडून असते. यामुळे वीजबिल आणि वारंवार होणाऱ्या भारनियमनाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून तरतूद करण्यात आली होती. यातून जिल्ह्यातील ६७ शाळांना पारेषण विरहित सौर वीज प्रकल्प बसविण्यास मान्यता मिळाली आहे.

आणखी शंभर शाळांसाठी प्रयत्न
जिल्हा नियोजन समितीकडून ६७ शाळांसाठी प्रकल्प बसविण्यास मंजुरी मिळाली असून, आणखी शंभर शाळांना सौर प्रकल्प बसविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील प्रयत्नशील आहेत. हे सौर वीज प्रकल्प बसविण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांच्याकडून ‘सीईआर’अंतर्गत निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यास मंजुरी मिळाल्यास आणखी शंभर शाळांचा वीजप्रश्‍न सुटणार आहे.
 
३०७ शाळांनी भरले थकीत बिल
थकीत बिलामुळे शाळेचा वीजपुरवठा तोडला जातो. ‘महावितरण’ची शाळांकडे कोट्यवधीच्या घरात थकबाकी आहे. यामुळे वीजपुरवठा नियमित होण्यासाठी गावातील ग्रामपंचायतीचे १४ व्या वित्त आयोगातील निधीतून शाळेचे थकित बिल भरण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ३०७ शाळांकडून १० लाख ९८ हजार ७५० रुपये थकित वीजबिल भरणा केला आहे. यात धरणगाव तालुक्‍यातून १९ शाळा, बोदवड- २१, पारोळा- ४४, चोपडा- १०३, अमळनेर- ५९, मुक्‍ताईनगर- ३५ आणि भुसावळ तालुक्‍यातील २६ शाळांनी भरणा केला आहे.

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
सातारा जिल्ह्यात २५४ टँकरद्वारे...सातारा  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
नगरमधील शेतकऱ्यांना साडेचाळीस कोटींचे...नगर  ः सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २००...
सांगलीत शेतकऱ्यांचा जनावरांसह मोर्चासांगली  : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता...
वऱ्हाडात बाजी कुणाची?अकोला ः  लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही...
पुणे विभागात ‘जलयुक्त’ची आठ हजारांवर...पुणे : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने...
नेता निवडीचा अधिकार राहुल गांधींनामुंबई  ः काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता...
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...