अकोला परिमंडळात अटल सौर कृषिपंप योजनेतून २३०० पंप कार्यान्वित

सौर कृषिपंप
सौर कृषिपंप

अकोला  : भारनियमन, वीजबिलापासून मुक्तता, तसेच वीजपुरवठ्यावरील ताण कमी होण्याच्या उद्देशाने सुरू झालेली अटल सौर कृषिपंप योजनेअंतर्गत महावितरणच्या अकोला परिमंडळात सुमारे २३०० पंप कार्यान्वित झाले अाहेत. यामुळे शेतकऱ्यांची अनेक अडचणींपासून सुटका झाली.

केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अटल सौर कृषिपंप योजनेसाठी अर्ज मागविण्यात अाले होते. अकोला परिमंडळातील अकोला, वाशीम अाणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांसाठी २६०० पंपांचे उ.िद्दष्ट देण्यात अाले होते. यासाठी दाखल अर्जांमधून ४१०० अर्जांची जिल्हा समित्यांनी निवड केली होती. निवड झालेल्यांना शेतकरी हिश्शाची रक्कम भरण्यासाठी मागणीपत्र देण्यात अाले. त्यानंतर एजन्सीकडून कृषिपंप बसविण्याचे काम सुरू झाले. अाजवर या परिमंडळात २६०० पैकी सुमारे २३०० कृषिपंप कार्यान्वीत झाले अाहेत. 

या सर्व कृषिपंपाचा वापर करीत असलेल्या शेतकऱ्यांचे अनुभव अत्यंत चांगले अाहेत. दिवसभरात कधीही हा पंप सुरू करून पिकाला पाणी देता येते. भारनियमनाच्या वेळापत्रकानुसार सिंचन करण्याचे बंधन नाही. कुठलेही वीजबिल भरण्याची गरज नसल्याने शेतकऱ्यांचा वर्षाचा हजारोंचा फायदा होत अाहे. तीन, पाच अाणि साडेसात अश्वशक्तीचे कृषिपंप देण्यात येत अाहेत. उ.िद्दष्टातील शिल्लक असलेल्यांच्या जोडण्या केल्या जात अाहेत.    

योजना सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात प्रतिसाद तितका मिळाला नाही. मात्र, नंतरच्या काळात इतर शेतकऱ्यांचे अनुभव चांगले असल्याचे पाहिल्यानंतर इतर शेतकरी या पंपासाठी पुढे सरसावले. अाता योजनेसाठी अर्जप्रक्रिया बंद अाहे. ही योजना नव्या प्रारूपात सरकार लवकरच अाणणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्हानिहाय उfद्दष्ट अाणि सुरू झालेले सौर कृषिपंप

जिल्हा उद्दीष्ट सुरु झालेले पंप
अकोला ६९५ ५८०
बुलडाणा   १०४० ८४१
वाशीम   ८६५ ८८०
एकूण उद्दिष्ट २६०० २३०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com