agriculture news in marathi, To solve the problem of farmers about tower | Agrowon

टॉवरग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

यवतमाळ : पॉवरग्रीड कंपनीच्या वतीने महागाव, पुसद तालुक्‍यांतील शेतशिवारात वीजवाहिनीसाठी टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. यासाठी जमीन घेतलेल्या शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला दिला जात असून, तो बाजारभावापेक्षा चारपट मिळावा, अशी मागणी टॉवर विरोधी कृती समितीने केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेत ही मागणी करण्यात आली.

यवतमाळ : पॉवरग्रीड कंपनीच्या वतीने महागाव, पुसद तालुक्‍यांतील शेतशिवारात वीजवाहिनीसाठी टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. यासाठी जमीन घेतलेल्या शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला दिला जात असून, तो बाजारभावापेक्षा चारपट मिळावा, अशी मागणी टॉवर विरोधी कृती समितीने केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेत ही मागणी करण्यात आली.

टॉवर विरोधी कृती समितीचे अध्यक्ष रामभाऊ गायकवाड, प्रशांत बोपीलवार, अविनाश वानखडे, किरण रेडे पाटील, रणजीत कवडे यांचा शिष्टमंडळात समावेश होता. विकासाचा बागुलबुवा उभा करून सुपीक जमीन बळकावल्या जात असल्याचा आरोप या वेळी शेतकऱ्यांनी केला. पावरग्रीड कंपनी यासाठी दंडेलशाहीचा अवलंब करीत आहे.

कमी मोबदला मिळाल्याने काही शेतकरी न्यायालयात गेले. ही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असताना पोलिसांची मदत घेत जबरीने शेतात मनोरे उभारले जात आहेत. एकट्या महागाव तालुक्‍यात 95 मनोरे उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. यातील बहुतांश शेतकरी अपुऱ्या मोबदल्याच्या कारणामुळे न्यायालयात गेले आहेत.

न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच मनोरे उभारणीदेखील केली जात आहे. रस्ते कामासाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. परंतु त्या नियमानुसार मनोरे उभारणीचे पैसे दिले गेले नाही.

शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा चारपट मोबदला मिळावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून प्रयत्न व्हावा, अशी मागणी करण्यात आली. शरद पवार यांनी टॉवरग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन या वेळी शिष्टमंडळाला दिले.

इतर बातम्या
`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे  ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...
वऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा  ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...
वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांत ४० टक्के...वर्धा : यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान...
धुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊसधुळे : शहरासह धुळे तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यात...
अमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...
मराठवाड्यात उपयुक्‍त पाणी उरले केवळ २५...औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाची...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
मालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...
वनामकृवि आणि महाअॅग्रोमध्ये सामंजस्य...परभणी ः कृषी विस्तार कार्याअंतर्गत सार्वजनिक-...
सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...
नव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...
पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...
हिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...
संगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
कोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर  : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...