agriculture news in Marathi, some parts of konkan may receive rain | Agrowon

काेकणात काही ठिकाणी पावसाचा अंदाज
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पुणे : राज्यात धो-धो कोसळणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी (ता. २२) ओसरला. शनिवारपर्यंत (ता.२५) कोकणात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून, उर्वरित मुख्यत: पावसाची उघडीप राहणार आहे. रविवारी (ता.२६) कोकणासह मध्य महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला अाहे.   

पुणे : राज्यात धो-धो कोसळणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी (ता. २२) ओसरला. शनिवारपर्यंत (ता.२५) कोकणात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून, उर्वरित मुख्यत: पावसाची उघडीप राहणार आहे. रविवारी (ता.२६) कोकणासह मध्य महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला अाहे.   

राज्यात पावसाने उघडीप दिली असून, अनेक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी येत होत्या. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. तर विदर्भ, मराठवाड्यात हलक्या पावसाने हजेरी लावली. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे सर्वाधिक २२२ मिलिमीटर पाऊस पडला; तर ठाण्यातील सरळगाव १०५ मिलिमीटर, साताऱ्यातील महाबळेश्‍वर येथे १३२ मिमी, तापोळा १६९ मिमी आणि लामज येथे १७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. 

 मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले असून, मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टाचा पूर्व भाग उत्तरेकडे सरकला आहे. बंगालच्या उपसागरात शनिवारी (ता. २५) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवारपासून कोकणासह राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे.  

बुधवारी (ता. २२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये), स्राेत ः कृषी विभाग : 
कोकण : टिटवाळा ७२, मुरबाड २२२, न्याहडी ९०, सरळगाव १०५, किन्हवळी ८८, उल्हासनगर ७६, पनवेल ७२, खालापूर चौक ९०, वौशी ७३, खोपोली ७०, मेंढा ७०, शिरगाव ९५, खेड ८५, अंबवली ८४, कुलवंडी ८३, भरणे ७३, दाभील ७२, फुणगुस ८२, फणसावणे ८२, अंगवली ७१, कोडगाव ९५, देवरुख ७०, तुलसानी ७१, माभले ७४, तेरहे ७१, विलवडे ८०, तलसरी ७६.  मध्य महाराष्ट्र : बोरगाव ६०, इगतपुरी ९०, घोटी ६०, धारगाव ७०, वेळुंजे ६७, मुठे ९९, भोलावडे ९५, काले १०२, लोणावळा ८६, राजूर ९४, बामणोली ६१, हेळवाक ६४, महाबळेश्‍वर १३२, तापोळा १६९, लामज १७३, करंजफेन ७२, आंबा १०५, राधानगरी ८४, कसबा ६६, साळवण ८८, गवसे ७२.  मराठवाडा : आनवा २८, जामखेड २२, ढवळवडगाव २२, मडळमोही २०, उमापूर ३०. विदर्भ : बावनबीर ३६, मलकापूर ४१, धरणगाव ३०, नांदूरा ३०, बार्शीटाकळी ३०, किन्हीराजा ३२, गिरोली ३५, धारणी ३०, सावळीखेडा ३४, सोमडोह ४१, खोलापूर ३६, धारगाव ३२, लाखंदूर ३०. 

इतर अॅग्रो विशेष
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीचएखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार...
पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीजागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...